Tuesday, September 20, 2016

21 वर्षाची वर्षा सुभाष मोडक बेपत्ता
          अमरावती, दि.12 (जिमाका): पोलिस आयुक्तालय अमरावती, शहर पोलिस ठाणे फ्रेजरपुरा हद्दीतील कु. वर्षा सुभाष मोडक ही राहणार किशोर नगर, डॉ. चाफले हॉस्पीटल जवळ, अमरावती दि.7 जुन, 16 रोजी शेगावला जाते असे म्हणुन घरुन गेली आज पावतो परत आली नाही. तिचा आजुबाजुला व नातेवाईकांकडे शोध घेतला तरीपण ती मिळुन आली नाही. पोलिस ठाणे फ्रेजरपुरा येथे दि.10 जुन, 16 रोजी मिसींग रजिस्टर क्र. 56/2016 प्रमाणे बेपत्ता असल्याची नोंद घेण्यात आली आहे. अद्यापर्यंत तिचा शोध लागला नाही, असे सहा.पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, अमरावती शहर यांनी कळविले आहे.
          बेपत्ता वर्षा मोडक ही 21 वर्षाची असुन तिची उंची 5 फुट 5 इंच आहे. तिचा रंग गोरा, बांधा सडपातळ, कपडे गुलाबी निळसर पंजाबी ड्रेस, चश्मा लावलेला आहे. ज्या कोणाला ह्या मुलीबाबत काही माहिती सांगावयाचे असल्यास किंवा शोध लागला तर पोलिस स्टेशन  फ्रेजरपुरा येथे 0721-2552600 या क्रमांकावर किंवा नियंत्रण कक्ष अमरावती शहर येथे 0721-2551000 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन गुन्हे शाखा, अमरावती शहराचे सहायक पोलीस आयुक्त यांनी केले आहे.
                                                          00000

काचावार/कोल्हे/दि.12-09-2016-19-30 वाजता

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...