22 सप्टेंबरच्या सकाळी 8 वाजता पासुन ते मराठा मुक मोर्चा संपेपर्यत
शहरात कलम 33 (1) (ब) लागू

            अमरावती, दि.20 (जिमाका): मराठा समाजाला आरक्षण मिळावे व इतर मागण्याकरीता सकल मराठा समाज बांधव अमरावती जिल्हा तर्फे दि.22 सप्टेंबर, 16 रोजी मराठा क्रांती मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्च्यासाठी अमरावती जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाहनासह नागरिक नेहरु मैदान येथे एकत्रित होवून नेहरु मैदान येथून मुक मोर्चाची सुरुवात करणार आहे. मोर्चा हा नेहरु मैदान-राजकमल चौक-शाम चौक-जयस्तंभ चौक-मालविय चौक-मर्च्युरी टी पॉईंट-इर्विन चौक-गर्ल्स हायस्कुल चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे.
          मोर्चाच्या या मार्गामध्ये वाहतुकीची कोंडी निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्या दृष्टीने मुंबई पोलिस कायदा कलम 33 (1) (ब) अन्वये तसेच मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 अन्वये पोलिस उपायुक्त (मुख्यालय) अमरावती शहर शशीकुमार मीणा यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार अमरावती शहरात दि.22 सप्टेंबर, 16 चे सकाळी 8 ते मोर्चा संपेपर्यंत खालीलप्रमाणे मार्गावरील वाहतुक बंद करुन इतर मार्गाने वळविण्याबाबत आदेश पारित केले आहे.
          जुनी वस्ती बडनेरा येथून गोपाल नगर कडुन, टी पॉईटकडून शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड व हलके चारचाकी मालवाहू वाहनांना व सिटी बसेस, एस.टी.बसेस यांना शहरामध्ये वाहतुक करण्यास प्रतिबंध राहील. त्यांनी जुनी वस्ती बडनेरा, जुना बायपास मार्गे बियाणी चौक, वेलकम टी पॉईट, रहाटगाव रिंगरोड, कठोरा जकात नाका, राजपुत धाबा या मार्गाचा शहरामध्ये येण्यासाठी अवलंब करावा. एस.टी.बस व सिटी बस यांना चपराशी चौक येथून डावे वळण घेवून फक्त बसस्थानक पर्यंतच येता येईल. या मार्गाने वाहतुन करणाऱ्या मोटार सायकल स्वारांना बियाणी चौक, आरटीओ मार्गे पंचवटी चौक, शेगाव नाका या मार्गाचा वापर करता येईल.
          वलगावकडुन कठोरा नाका मार्गे शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड व हलके चारचाकी मालवाहु वाहनांना शहरामध्ये वाहतुक करण्यास प्रतिबंध राहिल. त्यांना राजपुत धाबा, रहाटगाव रिंगरोडचा वापर करुन बडनेराकडे जाता येईल किंवा नवसारी रिंगरोडचा वापर करुन ट्रान्सपोर्ट नगरपर्यंत जाता येईल. या मार्गाने वाहतुक करणाऱ्या एस.टी.बसेसला राजपुत धाबा, रहाटगाव रिंगरोड, वेलकम टि पॉईट, बियाणी चौक, चपराशी पुरा चौक मार्गे एस.टी.स्टॅन्ड पर्यंत येता येईल. नागपूरकडुन येणाऱ्या एस.टी.बसेसला वेलकम टि पॉईट बिायाणी चौक, चपराशी पुरा चौक मार्गे एस.टी.स्टॅन्ड पर्यत येता येईल. इतर हलके व जड मालवाहु वाहनांना रहाटगाव रिंगरोड, नवसारी मार्गे ट्रान्सपोर्ट नगर पर्यत जाता येईल.
          भातकुली व लालखडी कडुन येणाऱ्या एस.टी.बसेस यांना नागपूरी गेट चौक येथून डावे वळण घेवून नवारी रिंगरोड, कठोरा जकात नाका, रहाटगाव रिंगरोड, वेलकम टि पॉईट, टि पॉईट बियाणी चौक, चपराशी पुरा चौक मार्गे एस.टी.स्टॅन्ड पर्यंत येता येईल. इतर हलके व जड मालवाहू वाहनांना नागपूरी गेट पासुन शहरात जाता येणार नाही.
          एस.टी. स्टॅन्ड व हमालपुराकडून रेल्वे स्टेशन, उड्डाणपुल मार्गे जयस्तंभ चौक व राजकमल चौकाकडे जाणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांना बंद राहिल. त्यांनी एस.टी. स्टॅन्डपासुन मालटेकडी चौक, श्यामनगर चौक, प्रशांतनगर चौक मार्गे कल्याण नगर व हमालपुराकडुन शहरात जाणाऱ्या वाहनांनी बँक ऑफ महाराष्ट्र व रुख्मीणी नगरकडुन आत जाणाऱ्या इतर मार्गाचा अवलंब करुन कल्याण नगर ते राजापेठ या मार्गाचा अवलंब करावा.
          रेल्वे स्टेशन चौकाकडून मर्च्युरी टि पॉईटकडे सर्व प्रकारचे वाहनांना वाहतुकीस प्रतिबंध राहिल त्यांनी वरीलप्रमाणे मार्गाचा अवलंब करावा.
          बियाणी चौकाकडुन कोर्ट चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रतिबंध राहिल. त्यांनी वेलकम टि पॉईंट रहाटगाव रिंगरोड मार्गाचा अवलंब करावा.
          बसब स्टॅन्डकडुन गर्ल्य हायस्कुल चौकाकडे येता येणार नाही. त्यांनी विलासनगर चौक, चौधरी चौक मार्गाचा किंवा पंचवटी चौक, वेलकम टि पॉईट, बियाणी चौक, चपराशीपुरा चौक या मार्गाचा अवलंब करावा.
          पोलिस पेट्रोलपंपाकडून गर्ल्स चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहिल. त्यांनी चपराशी पुरा चौक जुना बायपास मार्गाचा अवलंब करावा.
          राजापेठ ते राजकमल चौक ते मालविय चौक ते कोर्ट चौक, चित्रा चौक ते मालविय चौक ते कोर्ट चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनाच्या आवागमनास बंद राहिल. या मार्गाने वाहतुक करणाऱ्या वाहनांनी गांधी चौक, टांगापाडाव चौक, चित्रा चौक, दिपक चौक, चौधरी चौक, विलास नगर चौक ते बाबा कॉर्नर या मार्गाचा अवलंब करावा तसेच या मार्गावर राहणाऱ्या नागरिकांनी इतर अंतर्गत मार्गाचा अवलंब करावा.
          रेल्वे स्टेशन चौक ते राजकमल चौक, जयस्तंभ चौक, राजापेठे ते राजकमल चौक मार्गे मालविय चौक, चित्रा चौक ते कोर्ट चौक तसेच उडाणपुला खालीली या मार्गावर असलेल्या सर्व दुकानांचे समोर व इतर अंतर्गत मार्गावर कोणतेही वाहन उभे राहणार नाही.
          त्याच प्रमाणे सहा. पोलिस आयुक्त (वाहतुक), अमरावती शहर यांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोणातुन नियोजित अधिसुचनेमध्ये मराठा क्रांती मुक मोर्चा बंदोबस्त कालावधी दरम्यान वाहतुकीच्या नियमाबाबत अंशत: बदल करण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहे.
          ही अधिसुचना दि.22 सप्टेंबर, 16 चे सकाळी 8 वाजता ते मराठी क्रांती मुक मोर्चा कालावधी पुरताचा अंमलात राहिल. जो कोणी वाहनधारक सदर अधिसुचनेचे उल्लघन करेल त्यांच्या विरुद्ध मोटार वाहन कायदा 1988 व महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 अन्वये कार्यवाही करण्यात येईल असे पोलिस उपायुक्त (मुख्यालय) अमराती शहर यांनी कळविले आहे.
00000

काचावार/गावंडे/20-09-2016/19-05 वाजता

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती