Saturday, September 3, 2016

अवयवदान जागृती महाफेरीचे अमरावतीत आयोजन
* महा अवयव दान अभियान दि.30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर
       अमरावती,दि.29 (जिमाका): मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणी वरुन ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातुन ‘तेन त्यत्केन भुंजिथा’ म्हणजेच ‘त्याग करण्यात उत्तम आनंद’ असे अवयव दानाचे महत्व सांगितले आहे. या विचारांनी प्रेरित होवून महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार राज्यात महा अवयव दान अभियान राबविण्यात येणार आहे. दि. 30 ऑगस्ट रोजी अभियानाची सुरुवात करीत सकाळी 9.30 वा. अवयव दान महाफेरीचे आयोजन अमरावती व संपुर्ण जिल्ह्यात करण्यात आले आहे.
            पंतप्रधान यांच्या विचारांनी प्रेरित होवून मुख्यमंत्री व मंत्री, वैद्यकिय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी संपुर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी राज्यस्तरापासून ते तालुकास्तरापर्यंत महा अवयव दान अभियान दि.30 ऑगस्ट ते दि.1 सप्टेंबर, 16 या कालावधीत राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
            या अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या महाफेरीसाठी पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील, खासदार आनंदराव अडसुळ, सर्वश्री आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकेचे सन्मानिय सदस्य, विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलिस अधिक्षक लखमी गौतम यांना महाफेरीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. विविध सामाजिक संघटना, आएएमए, फॉक्सी, बालरोग संघटना, शल्य चिकित्सक संघटना, ई.एन.टी. संघटना, भिषक संघटना, शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी व आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी-कर्मचारी व नागरिकांनी सहभाग नोंदवून महाफेरीच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय अवयव दान अभियान समितीचे सदस्य सचिव डॉ.अरुण राऊत यांनी केले आहे.
            जिल्हा अवयव दान अभियान समितीचे अध्यक्ष पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील व सह अध्यक्ष जिल्हाधिकारी किरण गित्ते हे असुन जिल्ह्याच्या कार्यकरणीत स्थानिक खासदार, आमदार, महापौर व जिल्हा परिषद अध्यक्ष यांचा समावेश आहे. वरील समितीत शासकीय सदस्य म्हणून पोलिस आयुक्त, पोलिस अधिक्षक, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा माहिती अधिकारी, रोटरी क्लब, लाईन्स क्लब, जेष्ठ नागरिक संघ, अशासकीय/धर्मदायी संस्था, समाजसेवक, पत्रकार, ईलेक्ट्रॉनिक मिडीया प्रतिनिधी, डॉक्टर्स यांचा आंर्तभाव करण्यात येणार आहे. यानिमित्त जिल्हा समितीस शासकीय स्तरावरुन सुचना प्राप्त झाल्या आहेत, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अरुण राऊत यांनी कळविले आहे.
00000

काचावार/गावंडे/कोल्हे/दि.02-08-2016/17.05 वाजता

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...