Saturday, September 3, 2016

शहरात कलम 37 (1) (3) लागू
अमरावती दि.30 (जिमाका): शहरात शांतता व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राहावी यासाठी पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रात पोलीस उपायुक्त, (मुख्यालय) अमरावतीचे मोरेश्वर आत्राम यांनी एका आदेशान्वये दि.29 ऑगस्ट, 16 च्या मध्यरात्रीपासून ते दि.12 सप्टेंबर 16 च्या मध्यरात्रीपर्यंत दोन्ही दिवस धरुन एकूण 15 दिवस महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 37 (1) (3) अन्वये अनुक्रमे शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे.
तसेच कोणत्याही मेळाव्यास, मिरवणुकीस सक्षम अधिकाऱ्याच्या लेखी परवानगी शिवाय आयोजित करण्यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेसाठी धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन असे कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त (मुख्यालय) अमरावतीचे मोरेश्वर आत्राम यांनी कळविले आहे.
00000
वाघ/कोल्हे/दि.30-08-2016/17.58 वाजता


No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...