जिल्ह्यात कलम 38 लागू
* पोलीस अधिक्षक यांचे आदेशान्वये विना परवानगी वाद्य वाजविण्यास प्रतिबंध  
अमरावती, दि. 6 (जिमाका) : अमरावती ग्रामीण जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यात पोलीस अधिक्षक लखमी गौतम यांनी एका आदेशान्वये दि. 5 सप्टेंबर 16 ते 19 सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंत (पोलीस आयुक्तालयांचे क्षेत्र वगळुन) मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 38 अन्वये विना परवानगी वाद्य वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. सदर्हू आदेश संपूर्ण अमरावती जिल्हयात (पोलीस आयुक्तांचे क्षेत्र वगळून) लागू करण्यात आला आहे.
सदर आदेशानुसार जिल्ह्यात गणेशोत्सव, गौरी विसर्जन, बकरी ईद हे सण येणाऱ्या काळात साजरे केले जाणार आहे. यादरम्यान कोणतेही गायन किंवा वाद्य संगीत मोठया आवाजात वाजविण्यास, गोंगाटास बंधन लावण्यात आले आहे. कोणत्याही मेळाव्यास, मिरवणुकीस कोणत्याही ठिकाणी आयोजित करण्यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेसाठी धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन करण्यास मनाई करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांनी लेखी परवानगी देण्याअगोदर त्यांचेपेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी असे सूचीत केले आहे. 
या आदेशाचे उल्लंघन केल्यास उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधिक्षक अमरावती (ग्रामीण) लखमी गौतम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
वृत्त क्र.930                                                                                                    दिनांक 06-09-2016
शहरात कलम 36 लागू
अमरावती दि.30 (जिमाका): शहरात शांतता व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राहावी यासाठी पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रात पोलीस उपायुक्त, (परिमंडळ 1) अमरावतीचे शशि कुमार मीना (भा.पो.से.) यांनी एका आदेशान्वये दि.5 सप्टेंबर, 16 च्या मध्यरात्रीपासून ते दि.19 सप्टेंबर 16 च्या मध्यरात्रीपर्यंत दोन्ही दिवस धरुन एकूण 15 दिवस महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 36 अन्वये अनुक्रमे जमावबंदी आदेश जारी केला आहे.
गणेशोत्सव, विविध संघटनेच्या वतीने आंदोलने या काळात करण्यात येणार आहे. तसेच या दरम्यान कोणत्याही मेळाव्यास, मिरवणुकीस, जाहीस सभेस, मोर्चे, निदर्शने, पदयात्रा सक्षम अधिकाऱ्याच्या लेखी परवानगी शिवाय आयोजित करण्यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेसाठी धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन असे कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त (परिमंडळ 1) अमरावतीचे शशि कुमार मीना (भा.पो.से.) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000

काचावार/कोल्हे/दि.06-09-16/19-15 वा. 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती