महाराष्ट्र समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांसाठी विकास मार्ग -
पालकमंत्री प्रवीण पोटे
*धामणगाव रेल्वे येथे महाराजस्व अभियान

       अमरावती, दि.25 (जिमाका): प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा शेतकऱ्यांसाठी विकासाची गंगोत्री असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी धामणगाव रेल्वे येथील कृषि उत्पन्न बाजार समिती परिसरात आयोजित महाराजस्व अभियान 2016 विस्तारीत समाधान शिबीरात केले. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रा. विरेंद्र जगताप, पंचायत समिती सभापती राजनकर, नगर परिषद अध्यक्षा अर्चना राऊत, जिल्हाधिकारी किरण गित्ते उपस्थित होते.
          गेल्यावर्षी महाराजस्व अभियानातील 109 कार्यक्रमामधुन नागरिकांना 1 लाखापेक्षा जास्त विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी प्रास्ताविकात दिली. दर आठवड्याला मंडळस्तरीय कार्यक्रमात महाराजस्व अभियान सातत्याने राबवावे, अशी सुचनाही त्यांनी केली. शेतकऱ्यांना पीक विम्याच्या छत्रामुळे फायदा झाल्याची उदाहरणासहित माहिती त्यांनी दिली.
आमदार विरेंद्र जगताप यांनी स्थानिक प्रश्न व अडचणी पालकमंत्र्यासमोर मांडले.
एमएसआरडीसी मार्फत विकसीत करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे नागपुर-मुंबई हे अंतर कापण्यास लागणारा वेळ कमी होणार असुन त्यामुळे येथील युवकांना रोजगार मिळण्याच्या संधी उपलब्ध होतील. म्हणुन शेतकऱ्यांनी या विकास महामार्गासाठी जमिनी देण्यास पुढे यावे. शेतकऱ्यांना अंधारात ठेवुन जमीन अधिग्रहण करण्याची शासनाची भुमिका नाही. गेल्या 20-22 महिन्यात शासनाने राबविलेल्या अधिकतर योजनांचा केंद्रबिंदु हा शेतकरीच राहिला आहे. जलयुक्त शिवार, पंतप्रधान पीक विमा, जनधन योजना आदी योजनांचा धावता आढावा त्यांनी घेतला.
शासन हे जनतेला बांधील आहे. जनता-जनार्दनाने चुका दाखवाव्यात. फक्त विरोधासाठी विरोध न करता विकासासाठी पुढे येण्याचे आवाहन ही त्यांनी केले. कृषि समृद्धी महामार्गासाठी 811 हेक्टर जमीनीचे भूसंचयन करण्यात येणार आहे. यावेळी त्यांनी नविन भुसंपादन कायद्यामुळे शेतकऱ्यांना कोणते लाभ मिळणार हे सोदाहरण पटवुन दिले.
यावेळी कुटुंबसहाय्य योजनेअंतर्गत शारदा झटाले यांना 20 हजाराचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तर इतर लाभार्थ्यांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र, दारिद्ररेषा प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. महाराजस्व अभियानात शिक्षण, महिला बाल विकास, कृषि यासह विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते.
                                                                        00000

वाघ/कोल्हे/सागर/दि.25-08-2016/17.50वाजता








Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती