Saturday, September 10, 2016

लोकशाही दिनात चार तक्रारींची सुनावणी
     अमरावती, दि.06 : जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे कामकाज करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय मुळे, पुरवठा अधिकारी वानखडे तसेच सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
          जिल्हा लोकशाही दिनात 4 तक्रारींची सुनावणी होती. चारही तक्रारी संबंधित विभागांकडे आवश्यक कार्यवाही करीता पाठविण्यात आल्या. 10 प्रलंबित प्रकरणांपैकी 2 प्रकरणे निकाली निघाली असुन 8 प्रकरणे प्रलंबित आहे. तसेच 15 निवेदने प्राप्त झाली. यामध्ये महसुल विभाग 5, महावितरण 1, भुमिअभिलेख 2, परिषद अमरावतीशी संबंधित 1, सहसंचालक तंत्र शिक्षण विभाग 2, अधिक्षक अभियंता, सां. बा. विभाग 1 एकूण 12 तक्रारी प्राप्त झाल्या. याशिवाय जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी व जिला परिषद अमरावतीशी संबंधित प्रत्येकी एक तक्रारी निकाली काढण्यात आली आहे.
          प्राप्त निवेदनावर संबधित कार्यालय प्रमुखांनी तातडीने कारवाई करुन निवेदन कर्त्याचे समाधान करण्याबाबत अप्पर जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले.
00000

काचावार/कोल्हे/दि.06-09-16/18-00 वा. 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...