पालकमंत्री प्रविण पोटे दि.2 ते 7 सप्टेंबर पर्यत   
अमरावती जिल्हा दौऱ्यावर
          अमरावती, दि.2 (जिमाका): अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग, खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळुन) राज्यमंत्री प्रविण पोटे हे दि.2 ते 7 सप्टेंबर, 16 पर्यंत अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा तपशिल दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          दि.3 सप्टेंबर, 16 रोजी सकाळी 6-30 वाजता मुंबईवरुन निवासस्थानी आगमन. सकाळी 11 वाजता माहुली जहागीर येथे गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व भाजपा शाखेचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे कायदा व सुव्यवस्थाबाबत आढावा बैठक. दुपारी 3 वाजता स्थानिक विविध कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 6 वाजता भाजपा कार्यालय राजापेठ येथे भेट व बैठक. सोयीनूसार निवासस्थानी आगमन.
          दि.4 सप्टेंबर, 16 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृहावर आगमन व अभ्यागतांना भेटी. दुपारी 2 वाजता विविध कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनूसार निवासस्थान आगमन व मुक्काम.
          दि.5 सप्टेंबर, 16 रोजी सकाळी 9-45 ते दुपारी 2 पर्यंत निवासस्थानी राखीव. सायं.6-30 वाजता टोपेनगर गणेशोत्सव मंडळ येथे गणेशमुर्तीची स्थापना कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार निवासस्थानी मुक्काम.
          दि.6 सप्टेंबर, 16 रोजी सकाळी 9-45 ते दुपारी 2 पर्यंत निवासस्थानी राखीव. दुपारी 2 वाजता स्थानिक विविध कार्यक्रमास उपस्थिती. सायं.7-15 वाजता राठीनगर येथून शासकीय वाहनाने बडनेरा रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. सायं.7-57 वाजता विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
00000

वाघ/गावंडे/02-09-2016/16-22 वाजता

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती