Saturday, September 3, 2016

सौर ऊर्जा तंत्रज्ञानावर अधारित कार्यशाळा संपन्न
शासकीय तंत्रनिकेतन यांचा उपक्रम
सौर उर्जा तंत्रज्ञानातुन रोजगाराची संधी
            अमरावती दि.1 (जिमाका): भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालय अंतर्गत कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रु पॉलिटेक्निक योजना ही शासकीय तंत्रनिकेतन अमरावती येथे राबविण्यात येते. योजनेच्या तांत्रिक कौशल्य विकास, व्यवसाय, प्रशिक्षण व तंत्रनिकेतन प्रचार व प्रसार ह्या उद्दिष्टांतर्गत सौर उर्जा तंत्रज्ञानावर आधारित कार्यशाळा नुकतीच शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती या संस्थेच्या जिमखाना हॉलमध्ये संस्थेचे प्राचार्य डी.एन.शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
            या कार्यशाळेमध्ये अपारंपारिक उर्जा स्त्रोतची ओळख, फोरोव्हॉटस तंत्रज्ञान व वापर, पी.व्ही.सिस्टिमचे घटक, बॅटरी इनव्हेटर, चार्ज कंट्रोल, पी.व्ही.सिस्टीम मुलभूत घटक, पी.व्ही मॉडेल समस्या निराकरण, बॅटरी इनव्हेटर आणि कंट्रोलच्या समस्या निराकरण, आवश्यक उपकरणे त्यांचा उपयोग, नेट मिटरींग कार्यप्रणाली इत्यादी बाबीवर प्रात्यशिके व पीपीटीद्वारे सादरीकरण करण्यात आले.
            प्रभारी प्राचार्य तथा विभाग प्रमुख यंत्र अभियांत्रिकी ए.व्ही.उदासी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असुन प्रमुख पाहुणे म्हणुन (इ.सी.ई.) इंडिया एनर्जी प्रा.लि.चे संचालक डॉ.विश्राम बापट,       प्रा.एस.पी.पासेबंद, प्रा. पी.बी. उत्तरवार, प्रा. आर.एम. सकळकळे, डॉ.एस.पी.बाजड, प्रा. एच.एस.जोशी उपस्थित होते.
            योजनेवचे प्रकल्प समन्वयक प्रा.एस.जे.गायकवाड यांनी प्रास्ताविक भाषण व पाहुण्यांचा परिचय करुन दिला. डॉ.विश्राम बापट यांनी सौर उर्जा तंत्रज्ञान ही राष्ट्रहिता करीता आवश्यक आहे त्यामधुन रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होवू शकते असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. सौर उर्जा तंत्रज्ञान रोजगार प्राप्त होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात संधी आहे असे मत प्रा. एस.पी.पासेबंद यांनी व्यक्त केले. प्रा.ए.व्ही.उदासी यांनी सौर उर्जा तंत्रज्ञाना हे काळाची गरज आहे असे आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. सुत्र संचालन संदीप डाहाके तर आभार प्रदर्शन प्रा. एच.एस.जोशी यांनी मानले.
            सौर उर्जा तंत्रज्ञान कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी ओम बापट, आनंद मोरे, चंद्रशेखर इलके तसेच या योजनेचे प्रविण गडकर, निलेश जुनघरे, विनोद कदम, विनीत पाराशर, प्रशिक्षक संदेश लिंगोट, उमेश टाकरखेड, पुरुषोत्तम पाळेकर, जगदिश वैराळे, समीर उमप, गणेश मुझल्दा, हेमंत रुद्रकार, अनंत जामोदकर, मंगेश विरेकर व कर्मचारी वृंद, प्रशिक्षक यांनी परिश्रम घेतले. शासकीय तंत्रनिकेतन यंत्र अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी तसेच प्लास्टीक ॲण्ड पॉलीमर अभियांत्रिकीचे विद्यार्थी व योजनेचे ग्रामीण भागातुन आलेले प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

वाघ/गावंडे/दि.1-9-2016/18-11 वाजता

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...