Saturday, September 3, 2016

मुकबधीर महिलेची ओळख पटविण्याबाबत आवाहन
            अमरावती, दि.2 : पोलिस आयुक्तालय अमरावती, शहर पोलिस ठाणे सिटी कोतवाली हद्दीमध्ये मिळालेली मुकबधीर स्त्री दि.4 फेब्रुवारी, 16 रोजी ऑटो चालकास गश्त दरम्यान आढळुन आली. या महिलेचे वय 22 ते 25 वयोगटातील असुन ती मुकबधीर असल्याने नाव, गाव, पत्ता सांगु शकण्यास असमर्थ आहे. त्यामुळे महिलेला अकोला जिल्ह्यातील शासकीय महिला राज्यगृह (जागृती महिला वस्तीगृह, आदर्श कॉलनी) येथे ठेवण्यात आले आहे.
            सदर मुकबधीर महिला 22 ते 25 वयोगटातील असुन तिचा रंग निमगोरा, अंगात लाल रंगाची साडी, गुलाबी रंगाचे कपडे गुलाबी रंगाचे ब्लाऊज, लांबट चेहरा, काळे केस असे वर्णन आहे. ज्या कोणाला ह्या महिलेबाबत काही माहिती सांगावयाचे असल्यास किंवा शोध लागला तर पोलिस स्टेशन  सिटी कोतवाली येथे 0721-26720010 या क्रमांकावर किंवा शासकीय महिला राज्यगृह (जागृती महिला वस्तीगृह आदर्श कॉलनी अकोला, जि. अकोला) येथील 0724-2458697 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन गुन्हे शाखा, अमरावती शहराचे सहायक पोलीस आयुक्त यांनी केले आहे.
                                                                        00000

वाघ/कोल्हे/दि.02-9-2016/16-47 वाजता

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...