राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धा यशस्वीपणे राबवा
जिल्हाधिकारी किरण गित्ते
* स्पर्धाच्या आयोजनाबाबत जिल्हा क्रीडा परिषदेचा घेतला आढावा
            अमरावती, दि.24 (जिमाका): अमरावती जिल्ह्याला यावर्षीच्या राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्याचा बहुमान मिळाला आहे. या राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिल्या.
            जिल्हाधिकारी यांच्या कक्षात जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण कुळकर्णी, क्रीडा व युवक सेवा अमरावती विभागाच्या उपसंचालक प्रतिभा देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी, महानगर पालिका, जिल्हा पोलीस अधिक्षक विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेचे दि.24 ते 28 सप्टेंबर 16 रोजी विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड येथे आयोजन करण्यात येणार आहे. दि. 25 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा. या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेमध्ये राज्यातील 8 विभागातील 14, 17 व 19 वर्षे वयोगटातील मुले व मुलींची एकुण 48 संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेमध्ये एकुण 864 खेळाडु, 48 संघ व्यवस्थापक व 9 निवड समिती सदस्य तसेच 25 पंच उपस्थित राहणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने आवश्यक तयारी पुर्ण करण्याच्या सुचना ही जिल्हाधिकारी गित्ते यांनी दिल्या. बैठकीत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या माध्यमाने मांडण्यात आलेल्या इतरही विषयांवर चर्चा करण्यात आली.  
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन
स्व. मेंजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. यानिमित्त 29 ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शारीरिक शिक्षण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. या रॅली मध्ये 1 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग असणार असुन ही रॅली जिल्हा क्रीडा संकुल मोर्शी रोड येथुन प्रारंभ होऊन जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न होणार आहे.  यानंतर आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा यावेळी सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी दिली.           
00000

गावंडे/कोल्हे/24-08-2016/15-40 वाजता

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती