पालकमंत्री पांदण रस्ते अभियानाचा
पालकमंत्र्यांकडुन आढावा
     अमरावती, दि.06 (जिमाका) : शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या पालकमंत्री पांदण रस्ते अभियानाचा आढावा आज पालकमंत्र्यांनी घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी किरण गित्ते, सर्व तहसीलदार, बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील पांदण रस्त्याच्या कामाची माहिती पालकमंत्र्यांना दिली.
          लोकसहभागातुन भातकुली तालुक्यामध्ये 6 रस्त्यांचे काम झाले आहे. तिवसा तालुक्यात 13, धामणगांव रेल्वे मध्ये 19, अचलपुर मध्ये 15 पांदण रस्त्यांचे काम करण्यास वाव आहे. दर्यापुर 74, अंजनगांव सूर्जी 70 या तालुक्यांमध्ये लोकसहभागातुन माती काम मोठ्या प्रमाणात झाले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. पावसाळा संपत आल्यामुळे खडीकरणाचे काम तात्काळ सुरु करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या. लोकसहभागातुन एकुण 370 पांदण रस्त्यांचे काम करण्यात आले आहे. त्यांची लांबी 475 किमी आहे. लोकसहभागातुन आतापर्यत एकुण 193 लक्ष निधी खर्च करण्यात आला आहे. त्याचा फायदा 14913 शेतकऱ्यांना होणार आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजना मध्ये करण्यात आलेल्या रस्त्यांची लांबी 985 किमी आहे. अंजनगांव सुर्जी, भातकुली, धामणगांव रेल्वे, नांदगांव खंडेश्वर व तिवसा तालुक्यात खडीकरणाचे काम झाले नाही ते सुरु करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी केल्या.
00000

वाघ/कोल्हे/दि.06-09-16/17-19 वा.

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती