Saturday, September 10, 2016

अमरावती जिल्हा पत्रकार संघ व पारश्री स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने
नि:शुल्क आरोग्य शिबीर आज

          अमरावती, दि.3 (जिमाका): प्रसार माध्यमात काम करतांना होत असलेली धावपळ तसेच सतत असणारा तणाव पाहता त्याचा अत्यंत विपरीत परिणाम पत्रकारांच्या आरोग्यावर होत असतो. ही बाब लक्षात घेता अमरावती जिल्हा पत्रकार संघ व पारश्री स्पेशालिटी हॉस्पीटलच्या वतीने दि. 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा. पारश्री स्पेशालिटी हॉस्पीटल, उस्मानिया मस्जिद रोड येथे नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबीरआयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती अमरावती जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी दिली.

          महानगर पालिका आयुक्त हेमंत पवार यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलीक, ग्रामीण पोलीस अधीक्षक लखमी गौतम तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण कुळकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबीराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या शिबीरामध्ये डॉ. श्रीगोपाल राठी (एम.डी.मेडीसीन), डॉ. नितीन राठी (अस्थीरोग), डॉ. संदीप दानखेडे (बालरोग तज्ञ), डॉ. अनिल हरवाणी, डॉ. प्रविण व्यवहारे, डॉ. मनिष तोटे, डॉ. अतुल कढाणे ( नेत्र तज्ञ), डॉ. सौ. निर्मल राठी (एम.डी. पॅथॉलॉजी), डॉ. सौ. पल्लवी राठी (बीडीएस) आदी डॉक्टर्स या शिबीरात सेवा देणार आहेत. या शिबीरात जास्तीत जास्त पत्रकार व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अमरावती जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, सरचिटणीस विजय ओडे, शिबीर संयोजक चंदु सोजतिया यांनी केले आहे.
                                                          00000

काचावार/कोल्हे/03-09-2016/16-35 वाजता

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...