Tuesday, September 20, 2016

कुष्ठरोग निर्मुलनाकरीता
आता घरोघर सर्व्हेक्षण व प्रत्यक्ष तपासणी
          अमरावती, दि.17 (जिमाका):  कुष्ठरोग हा जंतुमार्फत होणारा व हवेच्या माध्यमातुन पसरणारा सामान्य आजार असला तरी समाजामध्ये कुष्ठरोगाविषयी अंधश्रद्धा व भिती आहे. त्यामुळे कुष्ठरोग झालेली व्यक्ती आपा आजार लपविते व त्यामुळे कुष्ठरोगाचा प्रसार होण्यास मदत होते. त्यामुळे अश्या लपलेल्या कुष्टरुग्णांना दुरीकरणाचे ध्येय साध्य करण्यासाठी केंद्र शासनाने दि. 19/9/16 ते 4/10/16 या कालावधीत कुष्ठरोग शोध अभियान राबविण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेला दिलेले आहेत.
            महाराष्ट्र राज्यात अमरावतीसह 16 जिल्ह्यामध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत संपुर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये एक आशा कर्मचारी व एक पुरुष कर्मचारी/स्वयंसेवक यांची चमु दर दिवशी घरोघरी भेटी देवुन कुष्टरोगाविषयी संक्षिप्त माहिती देतील व घरातील प्रत्येक व्यक्तीची शारिरीक तपासणी करतील.
            पालकमंत्री प्रवीण पोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, जि.प. उपाध्यक्षसतीश हाडोळे, महापौर चरणजीत कौर नंदा, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. डॉ. किरण कुलकर्णी, मनपा आयुक्त हेमंत पवार, आय.एम.ए.अध्यक्ष डॉ. वसंत लुंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन भालेराव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. तुकाराम आऊलवार तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गोविंद कासट यांनी अभियानाच्या यशस्वीतेकरीता शुभेच्छा देत सर्व नागरिकांना या अभियानामध्ये उत्स्फुर्तपणे सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. अशी माहिती वैद्यकिय अधिकारी (कुष्ठरोग) डॉ. अंकुश सिरसाट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.  
00000
काचावार/दि.17-09-2016/19-20 वा.


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...