एनपीएस बाबत प्रशिक्षण सुरु

       अमरावती, दि.23 (जिमाका): वरिष्ठ कोषागार कार्यालयातर्फे जिल्हा स्तरावर आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकरीता 23 ते 26 ऑगस्ट पर्यत एनपीएस बाबत सविस्तर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.  सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यत विद्यापीठ रोड स्थित स्थानीय सहसंचालक कार्यालय, लेखा-कोष भवन येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
          यामध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना व त्यांचे फायदे, सेवानिवृत्ती नंतरचे लाभ, आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी करायची विस्तृत कार्यपद्धती, प्राण कीटचा वापर, कर्मचाऱ्यांच्या माहिती दुरुस्ती करण्यासाठी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात आहरण व संवितरण अधिकारी, वेतन देयक लिपीक व एनपीएस बाबत माहितीगार कर्मचारी यांनी उपस्थित राहावे. आहरण अधिकाऱ्यांनी सीएसआरएफ फार्मची माहिती सोबत आणावी. हे प्रशिक्षण महत्वाचे असून यासाठी संबंधितांनी उपस्थित रहावे, असे वरिष्ठ कोषागार अधिकारी व्यं. व. जोशी यांनी कळविले आहे.
          आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम पुढील प्रमाणे. 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यत (6101001301 ते 6101002050) पर्यतचे अधिकारी, 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यत (6101002051 ते 6101004050)पर्यतचे अधिकारी, 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यत (6101004051 ते 6101005720) व दुपारी 2 ते सायं. 5 वाजेपर्यत (6101005721 ते 6101964043) पर्यतच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.  
                                                                        00000

काचावार/गावंडे/कोल्हे/दि.23-08-2016/16.50 वाजता

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती