Saturday, September 10, 2016

अमरावती येथे सप्टेंबर अखेर महाआरोग्य शिबीर
पालकमंत्री पोटे यांनी घेतली पुर्वतयारी बैठक
* सर्व डॉक्टरांनी योगदान देण्याचे आवाहन

       अमरावती, दि.8 (जिमाका) : येथील वैद्यकिय शिक्षण विभाग, आरोग्य सेवा विभाग, जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथे सप्टेंबर अखेर विनामुल्य महाआरोग्य शिबीर आयोजिण्यात येणार असुन या शिबिरात सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर्सकडून मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. त्याचा पुर्वतयारी बैठक पालकमंत्री प्रविण पोटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेतली.

          जिल्हाधिकारी किरण गित्ते, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अरुण राऊत, जिल्हा आरोग्‍य अधिकारी डॉ.भालेराव, सुपरस्पेशालिटीचे डॉ.निकम, आयएमए चे प्रतिनिधी, खाजगी डॉक्टर्स संघटनांचे प्रतिनिधी, जिल्हा हिवताप अधिकारी, सहाय्यक संचालक डॉ.आहुलवार, आरोग्य यंत्रणेचे प्रमुख आदी उपस्थित होते.

          पालकमंत्री पोटे म्हणाले, शेतकऱ्यांच्या आरोग्यावरील खर्च हा एक आत्महत्या करण्याचे कारण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वांची मोफत आरोग्य तपासणी करण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने विनामुल्य महाआरोग्य शिबीर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. या शिबिरासाठी खाजगी डॉक्टर्स मोठ्या प्रमाणावर मदत करु इच्छितात. प्रत्येक गावातुन 3-4 रुग्ण ग्रहित धरले तरी साधारण 30-35 हजार लोक या शिबिरासाठी येतील. रुग्णांची निवास, भोजनाची व्यवस्था तसेच त्यांच्या नातेवाईकांची व्यवस्था आदीसाठी पैसा कमी पडु दिला जाणार नाही. तपासणीसाठी येणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांची व सर्जनची भुमिका मोठी राहणार असुन त्यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले. यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थित डॉक्टरांकडून शिबीर यशस्वी करण्यासाठी सुचना एैकूण घेतल्या.

          जिल्हाधिकारी गित्ते म्हणाले, शिबीर यशस्वी करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात येणार आहे. ही समिती येणारे अपेक्षित रुग्ण, लागणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या, औषधांची उपलब्धता, खाजगी डॉक्टरांकडून घ्यावयाचे सहकार्य, रुग्णांना पुढील उपचारासाठी करावयाची कार्यवाही आदी नियोजन करेल. या शिबिरामुळे लोकांचे समाधान होणार असुन डॉक्टरांनी उपचारासाठी हयगय किंवा लापरवाही करु नये. या शिबिरात गावातील लोकांशिवाय फिरते लोक उदा.तांडे, वाड्या, वस्ती अशा लोकांनाही सहभागी करुन घ्यावयाचे आहे. मदतीसाठी जिल्ह्यातील आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका अशा सुमारे 4 हजार स्टाफची मदत घ्यावी. शिबीर यशस्वी करण्यासाठी काय काय मदत लागणार आहे त्याचे नियोजन करावे.

          नियोजन करतांना वैद्यकिय संस्था, आजारनिहाय, सुपरस्पेशालिटीनिहाय नियोजन करावे. जिल्हास्तरावर एक कंट्रोल रुम सुरु करण्यात येणार असुन त्याच्याही सुचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

          महाशिबिरासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सुरुवातीस उपचार करावे. त्यानंतर सुपरस्पेशालिटी मार्फत उपचार घ्यावे, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद अशा सर्वच प्रकारातुन रुग्णांवर उपचार व्हावे, विविध कारणाअभावी रखडलेल्या रुग्णांचा आजारावर उपचार करावे, निधी भरपूर असावा, उप जिल्हा रुग्णालय अद्यावत करावी अशा उपयुक्त सुचना यावेळी डॉक्टरांनी केल्या.  
00000
काचावार/गावंडे/सागर/दि.08-09-2016/15-40 वाजता


                                                                                                                                       


 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...