महा अवयवदान रॅलीत सहभागी व्हा- डॉ. अरुण राऊत यांचे आवाहन
30 ऑगस्ट रोजी रॅली
       अमरावती,दि.29 (जिमाका): पालकमंत्री प्रवीण पोटे व जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या अधिनस्थ स्थापित महा अवयव दान समितीच्या वतीने दि. 30 ऑगस्ट 16 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन सकाळी 9 वा. भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.   
          अवयवदानाविषयी समाजात जाणीव जागृती निर्माण व्हावी म्हणुन दि 22 ते 29 ऑगस्ट दरम्यान राज्य शासनातर्फे अवयव दान सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यातील एक उपक्रम म्हणुन या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. अवयव प्राप्त न झाल्यामुळे मृत्युचे प्रमाण शुन्यावर आणणे व या अवयव दानासाठी नागरिकांना वैयक्तीक व सामाजिक पातळीवर प्रेरित करणे, हा या रॅलीचा मुख्य उद्देश्य आहे. रॅली सकाळी 9 वा. जिल्हा सामान्य रुग्णालयातुन निघणार आहे. तरी या रॅलीत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत यांनी केले आहे.
00000

वाघ/कोल्हे/दि.29-08-2016/2.00 वाजता

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती