Saturday, September 3, 2016

लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियानांतर्गत
दि. 29 ऑगस्ट पर्यत देखावा स्पर्धेत सहभागी होण्याचे
शिक्षणाधिकारी यांचे आवाहन
          अमरावती, दि.26 (जिमाका) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सार्वजनिक गणेशोत्सव अभियानातंर्गत तालुका स्तरापासुन विभाग स्तरापर्यत देखावा स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांना दि.29 ऑगस्ट 16 पर्यत शिक्षणाधिकारी पंचायत समिती स्तरावर अर्ज सादर करावे. स्पर्धेत किमान 5 मंडळ सहभागी झाल्यास प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यात येतील. तालुका स्तरावर अनुक्रमे 25 हजार, 15 हजार, 10 हजार, जिल्हा स्तरावर अनुक्रमे 1 लाख, 75 हजार, 50 हजार तसेच विभाग स्तरावर 2 लाख, 1.50 लाख व 1 लाख रुपयाचे बक्षीस वितरीत करण्यात येईल. या उपक्रमामध्ये शिक्षणाधिकारी, महाविद्यालयाचे प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी व इतर दोन सदस्य सहभागी आहेत.
          लोकमान्य टिळकांचे कार्य जनतेपर्यत पोहोचविण्यासाठी या शासनाच्या अभिनव उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी कळविले आहे.
           
00000
वाघ/कोल्हे/दि.26-08-2016/18-10 वाजता



No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...