जिल्हा पत्रकार संघाच्या आरोग्य शिबीराला अभुतपुर्व प्रतिसाद
* आयुक्त हेमंत पवार यांच्या हिमतीला दिली उपस्थितांनी सलामी
* 350 जणांची झाली निशुल्क आरोग्य तपासणी

          अमरावती, दि.4 (जिमाका): जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने स्थानिक पारश्री हॉस्पिटल येथे रविवार दि.4 जुलै रोजी आयोजित मोफत आरोग्य शिबिरास जिल्हास्तरीय पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांनी उपस्थिती राहुन विविध आरोग्य तपासणी करुन घेतल्या. जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण विभागात अश्या स्वरुपाचे भव्य आयोजन आतापर्यंत झाले नाही अशी दाद यावेळी उपस्थित वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर मंडळांनी दिली. या भव्य शिबिरात करण्यात आलेल्या विविध तपासणीत एकूण 350 जणांनी भाग घेतला. यात पारश्री हॉस्पिटल व त्यांच्या संपुर्ण चमुचे विशेष सहकार्य लाभले.
          जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार व त्यांच्या कुटुंबियाकरीता मोफत तपासणी शिबिराचे आयोजन घेण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त हेमंत पवार यांच्यासह प्रमुख उपस्थितीत पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलिस अधिक्षक लखमी गौतम, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल अग्रवाल, डॉ.गोपाल राठी, डॉ.नितीन राठी, डॉ.सौ.निर्मला राठी, डॉ.सौ.पल्लवी राठी, डॉ.अनिल हिरवाणी, डॉ.अतुल कठाणे, डॉ.संदिप वानखेडे, डॉ.प्रविण व्यवहारे, डॉ.मनिष तोटे, डॉ.राजु जयस्वाल, डॉ.राधेश्याम मालाणी, डॉ.आशिष देहरे, डॉ.सय्यद जामीन, डॉ.रविंद्र पकडे, डॉ.अर्चना भटकर, डॉ.रजत बोरा यांची मंचावर उपस्थित होती.
          या शिबिरांचे संयोजक चंद्रकात सोजतिया यांनी अश्या स्वरुपाचे उपक्रम व त्यामागील पत्रकार संघाची भुमिका विषद केली. विशेष उपस्थिती लाभलेल्या पोलिस अधिक्षक लखमी गौतम यांनी पत्रकार व पोलिसांची कामाची पद्धत पाहता सतत मानसिक दबावाखाली काम करावे लागते त्याच वेळी जनतेच्या अपेक्षा सुद्धा पुर्ण करावे लागतात. यात आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे फार गंभीर परिणाम भोगावे लागतात. अश्यावेळी जिल्हा पत्रकार संघाचा हा मोठा व अतिशय सकारात्मक उपक्रम पुढेही कायम रहावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
          पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी आरोग्याबाबत जागरुक राहणे, वर्तमान काळात सर्वात मोठा उपचार असुन वेळीच न्यात होणे व आरोग्य संदर्भात विशेष दक्षता घेण्याची गरज पत्रकार व यांच्या कुटुंबियांना सुद्धा असते. अतिशय मोलाचे काम पत्रकार संघ करीत असुन त्याकरीता सर्वतोपरी सहकार्य पोलिस विभागाचे राहील अशी ग्वाही यावेळी दिली.




          जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी यावेळी बोलतांना सांगितले की, पत्रकार व त्यासाठी ग्रामीण भागात काम करणारे माध्यम प्रतिनिधी यांचे स्वत:च्या आरोग्याकडे फार दुर्लक्ष होते. हा मुद्दा गंभीर असुन शेवटच्या टोकावर आजार जाणे हे परवडणारे नाही. पत्रकार संघाचे चंदुभाऊ सोजतिया यांनी अत्यंत मेहनत घेवून डॉ.गोपाल राठी व त्यांच्या चमुच्या सहकार्याने आज हे भव्य आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ग्रामीण भागातील पत्रकारांची विशेष दखल घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करुन उपस्थिती मान्यवरांचे हस्ते मोर्शी नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, धारणी येथील पत्रकारांचा सन्मान व्यासपिठावर करण्यात आला.
          कार्यक्रमाचे अध्यक्ष मनापा आयुक्त हेमंत पवार यांनी अत्यंत मर्मस्पर्शी अनुभव कथन उपस्थितांसमोर मांडुन आरोग्याची वेळीच दखल घेणे कसे गरजेचे आहे हे स्पष्ट केले. त्यांनी कर्करोगांशी दिलेला लढा एकूण मान्यवरासह उपस्थित पत्रकार भावुक झाले. आज या भव्य शिबिरामध्ये आरोग्याकडे पाहता पत्रकारांनी आरोग्याबाबत अतिशय दक्ष राहावे हा कळकळीचा संदेश हेमंत पवार यांनी दिला.
          यावेळी शिबीर संयोजक चंदुभाऊ सोजतिया यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघाचे उपाध्यक्ष त्रिदिप वानखडे, संजय मापले यांनी केले. यावेळी शहरासह जिल्ह्यातील पत्रकार व त्यांचा परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
                                                         00000

काचावार/गावंडे/04-09-2016/18-35 वाजता

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती