नागरी स्वच्छता अभियानात अमरावती जिल्हा आघाडीवर  
3 सप्‍टेंबर रोजी मुख्‍यमंत्री व अमिताभ बच्‍चन यांचेकडून
अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांचा सत्‍कार आयोजित

          अमरावती दि.2-  स्‍वच्‍छ भारत अभियानाचा एक भाग म्‍हणून राज्‍य शासनाने महाराष्‍ट्रात स्‍वच्‍छ महाराष्‍ट्र अभियान दि. 15 मे,2015 रोजी सुरु केले आहे. अमरावती जिल्हा अभियानात आघाडीवर आहे. या शिवाय स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या वेबसाईटवर अमरावती जिल्ह्यातील शहरामधील पूर्ण झालेल्या शौचालय बांधकामाची छायाचित्रे अपलोडिंगची कामगिरी चांगली केल्यामुळे अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांचा मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मा.अमिताभ बच्चन यांच्या हस्ते दि.3 सप्टेंबर,16 रोजी सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, मंत्रालयासमोर,नरिमन पॉईंट, मुंबई 400 021 येथे महाक्लीनीथॉन हा समारंभ आयोजिला आहे.
          या अभियानांतर्गत अमरावती जिल्‍ह्यातील सर्व नगर पालिका व नगर पंचायतींमध्‍ये शौचालयाचे बांधकाम पूर्ण करुन शहरांना Open Defecation Free (ODF) घोषित करणे हे अभियानाचे पहिले उद्दिष्ट आहे. जिल्‍ह्यातील 10 नगर परिषदांपैकी आतापर्यंत चिखलदरा व वरुड शहरांना Open Defecation Free (ODF) जाहिर केलेले आहेत. तसेच मोर्शी, शेंदुरजना घाट, धामणगाव रेल्‍वे, चांदुर रेल्‍वे, चांदुर बाजार ही शहरे सुध्‍दा अंतीम टप्‍प्‍यात पोहोचली आहेत.  उर्वरीत सर्व शहरे दिनांक 31 मार्च,2017 पर्यंत पुर्ण करण्‍याचे नियोजन करण्‍यात आलेले आहे.
          या अभियानांतर्गत जिल्‍ह्यात एकूण 10,475 शौचालयाची निर्मिती करण्यात आलेली असून राज्‍यात पूणे जिल्‍हा 20,133 व ठाणे जिल्‍हा 19,633 या पाठोपाठ अमरावती जिल्‍ह्याचा तिसरा क्रमांक लागतो. स्‍वच्‍छ महाराष्‍ट्र अभियानांतर्गत अमरावती जिल्‍ह्याची कामगिरी चांगली असल्‍याने दि.03 सप्‍टेंबर,2016 रोजी मुंबई येथे आयोजीत महाक्‍लीनीथॉन कार्यक्रमात मा.मुख्‍यमंत्री आणि श्री.अमिताभ बच्‍चन यांच्‍या उपस्थितीत अमरावती जिल्‍ह्याला पुरस्‍कृत केल्‍या जाणार आहे.  स्‍वच्‍छ महाराष्‍ट्र अभियानांतर्गत नागरी भागात राहणाऱ्या लोकांना शौचालय बांधकामासाठी 17,000 रुपयांचे अनुदान दिले जाते. यापैकी 12,000 रुपयांचे अनुदान स्‍वच्‍छ भारत अभियानांतर्गत तर 5,000 रुपयांचे अनुदान संबंधित नगर पालिका/ नगर पंचायतींमधून दिले जाते.  अद्यापपर्यंत या अभियानांतर्गत जिल्‍ह्याला एकूण 13.17 कोटी निधी प्राप्‍त झाला असून 10.44 इतका निधी 31 ऑगष्‍ट,2016 पर्यंत खर्च करण्‍यात आलेला आहे.  

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती