Tuesday, September 20, 2016

शालेय विद्यार्थ्यांकरीता आधार नोंदणी
जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याहस्ते शुभारंभ
·        गणेशोत्सव दरम्यान अमरावती जिल्ह्यात 21234 आधार नोंदणी
·        ज्यांनी आधार नोंदणी केली नाही त्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन
·        जीवनभरासाठी आधार कार्ड उपयुक्त
·        आधार नोंदणीसाठी अडवणूक करणाऱ्या ऑपरेटर्स ची मान्यता रद्द करणार
          अमरावती, दि.16 (जिमाका):  शासनाच्या सुमारे 150 विविध प्रकारच्या योजना असून या योजनांचा लाभ मिळण्यासाठी तसेच शिधापत्रिका,पासपोर्ट, शाळेचा दाखला, आदी सर्वच कामासाठी सर्वच कामासाठी देशात तसेच जगभरात कोठेही जीवनभर आधार कार्ड उपयुक्त आहे. अद्यापही अमरावती जिल्ह्यात सुमारे 50 हजार विद्यार्थी आधार कार्ड नोंदणीपासून दूर आहेत. यासाठी तातडीने महानगर पालिका, जिल्हा परिषद तसेच सर्व शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी, विद्यार्थीनी, सर्वसामान्य नागरिक यांनी आधार कार्ड नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले आहे.
            येथील पठाण चौकातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय विद्यार्थ्यांकरीता आयोजित आधार नोंदणी कँप चा शुभारंभ गित्ते यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते. निवासी उप जिल्हाधिकारी मोहन पातूरकर, तहसिलदार बगळे, मनपाचे शिक्षण सभापती अरिफ हुसेन, नगर सेवक हमिद, शिक्षणाधिकारी  श्रीराम पानझाडे आदी उपस्थित होते. 
            पठाण चौकातील जिल्हा परिषद शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करण्यासाठी पाच मशिन उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. पुढील 2-3 दिवस हे काम चालू राहाणार आहे. यासाठी सर्व शिक्षकांनी तसेच संबंधित पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण आधार नोंदणी होईल याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले.
            पठाण चौकातील जिल्हा परिषदेची शाळा ही ब्रिटिश कालिन असून या शाळेची सध्या दुरावस्था झाली आहे. ऐतिहासिक अशा या इमारतीस पूर्ववैभव प्राप्त करुन देण्यासाठी आवश्यकती रंगरंगोटी आणि दुरुस्ती करण्यात येईल. तसेच शाळेच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी यादी तयार करावी त्यास येत्या जून,2017 पूर्वी दुरुस्ती करण्यात येईल.
आधार नोंदणीसाठी अडवणूक करणाऱ्या ऑपरेटर्सवर कारवाई करणार
            जिल्हाधिकारी म्हणाले की, ज्यांना आधार नोंदणीचे काम दिले आहे त्या ऑपरेटर्सनी नागरिकांकडून आधार नोंदणीसाठी पैशाची मागणी केली किंवा अडवणूक केली. लोकांशी उध्दटपणे वागल्यास त्यांची मान्यता तात्काळ रद्द करण्यात येईल व त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशाराही  जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
00000

काचावार/दि.16-09-2016/14-30 वा.





No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...