Saturday, September 3, 2016

अवयवदान जागृती महाफेरी उत्साहात
* महाविद्यालयांनी घेतला उत्स्फुर्त प्रतिसाद
*अवयवदान श्रेष्ठ दान ने दुमदुमला परिसर
       अमरावती,दि.30 (जिमाका): जिल्हा सामान्य रुग्णालयातुन निघालेल्या अवयवदानाची जागृती महाफेरी आज उत्साहात पार पडली. सकाळी 9.30 वा. च्या सुमारास निघालेल्या या महाफेरीत विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. अवयव दान महाफेरीच्या जागृती रथाला विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता, जिल्हाधिकारी किरण गित्ते, महापौर चरणजीतकौर नंदा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी भालेराव, सुपर स्पेशालिटीचे अधिक्षक डॉ. श्यामसुंदर निकम, अजय साखरे, उमेश आगरकर, इर्विन व डफरीन चे सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांनी या महाफेरीचे हिरवी झेंडी दाखवुन सुरुवात केली. यामध्ये त्यांनी आज राज्यभर राबविण्यात आलेल्या अवयवदान जनजागृती रॅलीची माहिती दिली. अवयवदानाने अनेकांचे जीव वाचवू शकतात. म्हणुन या अवयवदानासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी केले.
ही महाफेरी जिल्हा सामान्य रुग्णालय ते राजकमल चौकामागे सुपर स्पेशालिटी पर्यत आली. संपुर्ण महाफेरी दरम्यान विद्यार्थ्यांनी अवयवदान श्रेष्ठ दान या आशयाच्या घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांच्या हातात जनजागृतीचे छापील संदेश होते. तेथे सुपर स्पेशालिटीचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी रॅलीतील विद्यार्थ्यांना संबोधित केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत यांनी विद्यार्थ्यांना अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी आवाहन केले. यावेळी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक राजेश पिदडी यांनी अत्यंत प्रेरणात्मक शब्दात विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
महारॅलीत ब्रिजलाल बियाणी महाविद्यालय, महिला महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, युवा शक्ती महाविद्यालय, विद्याभारती महाविद्यालय, इंदिरा बाई मेघे महिला महाविद्यालय, तक्षशिला महिला महाविद्यालय, शारिरीक शिक्षण विभाग हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांनी सहभाग घेतला. डॉ. दिनेश राऊत, डॉ. शोभा रोकडे, डॉ. रिना लहरिया, डॉ. दास आदी देखील रॅलीत सहभागी होता.
00000

वाघ/कोल्हे/दि.30-08-2016/13.47 वाजता.










No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...