भातकुली तालुक्यातील 21 गावांमध्ये
रास्तभाव दुकान मंजुरीसाठी स्वयंम सहाय्यता बचत गटांकडून अर्ज आमंत्रित *जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
            अमरावती दि.21 (जिमाका): शासन आदेशानुसार रास्तभाव दुकाने स्वयं सहाय्यता महिला बचत गटांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के वानखडे यांनी भातकुली तालुका क्षेत्रातील 21 गावांकरीता दि. 20 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर 16 दरम्यान संबंधितांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.   
          दि. 20 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर 16 दरम्यान भातकुली तालुक्यातील परलाम, नवथाळ बु., चेचरवाडी, उमरापुर, ततारपुर, इब्राहिमपुर, उदापुर, मक्रमपुर, नारायणपुर, वंडली, बोकुरखेडा, मलकापुर, कृष्णापुर, कोलटेक, निंदोळी, बैलमारखेडा, सरमसपुर, अडवी, डेंगुरखेडा, काकरखेडा, मक्रंदाबाद या गावात रास्तभाव दुकानांसाठी स्वयं सहायता महिला बचत गटांना अर्ज सादर करण्याचे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधीत महिला बचतगटांना अर्ज कार्यालयीन वेळेत भातकुली तहसील कार्यालयामध्ये विक्री व स्वीकृत केल्या जातील.   
          जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या दिशानिर्देशानुसार ज्या गावासाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याच गावातील स्वयं सहाय्यता महिला बचत गटांना अर्ज करता येणार आहे. स्वयं सहाय्यता बचत गटाची निवड करतांना महिला स्वयं सहायता गटांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. महिला बचत गट उपलब्ध न झाल्यास पुरुष बचत गटांना प्राधान्य देण्यात येईल. जेष्ठ, वर्धनक्षम व नियमित गटांचा निवडीदरम्यान विचार करण्यात येणार आहे. रास्त भाव दुकान परवाना मंजुर करण्याची कार्यवाही जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती द्वारे करण्यात येईल. समिती समक्ष परवाना मंजुरीसाठी येणारे प्रस्ताव महिला ग्रामसभेसमोर विचारार्थ व शिफारशीसाठी ठेवील. महिला ग्रामसभेच्या शिफारशीनुसार प्रस्तावाला अंतिम मंजुरी देण्यात येईल.
          संबंधीत स्वयं सहाय्यता महिला बचत गटांनी विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रासह रास्तभाव दुकानांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखडे यांनी केले आहे.
00000

काचावार/कोल्हे/दि.21-09-2016/15-59 वाजता

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती