Saturday, September 10, 2016

       राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित
            अमरावती, दि.7 (जिमाका) : राष्ट्रीय युवा पुरस्काराकरीता 15 ते 29 वर्ष वयोगटातील युवक-युवती व नोंदणीकृत संस्थेला त्यांच्या कार्याचे अवलोकन करुन पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कारामध्ये गौरवपत्र, सन्माचिन्ह व रोख रक्कम यांचा समावेश आहे. या पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित असुन दि.8 सप्टेंबर, 16 पर्यंत अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विभागीय क्रीड संकुल या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येतील. आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दि.9 सप्टेंबर, 16 पुर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे दोन प्रतीत अर्ज सादर करावा. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही. अधिक माहिती साठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांशी संपर्क करावा.
                                                                        00000
वृत्त क्र933                                                          दिनांक 07-09-2016
समाज कल्याण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांना मुदतवाढ
            अमरावती, दि.7 (जिमाका) : समाज कल्याण विभागातर्फे देण्यात येणाऱ्या पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, शाहु-फुले आंबेडकर पारितोषिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत रविदास पुरस्कार 2016-17 साठी व्यक्ति व संस्था यांचे प्रस्ताव मागविण्याकरीता 9 सप्टेंबर 16 पर्यत मुदत वाढविण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त कार्यालय, सामाजिक न्याय भवन, चांदुर रेलवे रोड, येथे प्रत्यक्ष किंवा 2661261 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.  
00000
वृत्त क्र934                                                          दिनांक 07-09-2016
आरे दुधाबाबत सुचना
            अमरावती, दि.7 (जिमाका) : 8 सप्टेंबर पासुन शहरात वितरित होणाऱ्या आरे ब्रान्ड अंतर्गत पिशवी बंद दुधाच्या पाकीटवर 1000 मिली. पाश्चराईज होमोजिनाईज टोन्ड मिल्क किंमत 32 रुपये असे छापले असले तरी त्या ऐवजी ग्राहकांनी तो 500 मिली होमोजिनाईज प्रकिया गाय दुध किंमत रु. 17 समजण्यात येऊन पिशवी बंद पाकिट खरीदण्यात यावे. 500 मिली चा साठा योजनेकडे उपलब्ध होताच पुर्ववत ग्राहकांना 500 मिली छापिल पाकिटातुन दुधाचे वितरण करण्यात येईल, असे दुग्ध शाळा व्यवस्थापक शासकीय दुग्ध योजना अमरावती यांनी कळविले आहे.
00000
वाघ/गावंडे/कोल्हे/दि.07-9-2016/14-35 वाजता


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...