Saturday, September 10, 2016

शेतकरी सुखी व समृद्धी व्हावा हे शासनाचे ध्येय
पालकमंत्री प्रविण पोटे
          अमरावती, दि.8 (जिमाका) : राज्यातील शेतकरी सुखी व समृद्धी व्हावा हे शासनाचे ध्येय असुन सर्वांर्थाने शेतकरी हिताच्या दृष्टीने शासन निर्णय घेत आहे. नाफेडच्या वतीने मुंग खरेदी, केंद्रातून शेतकऱ्यांच्या मुंगाला योग्य तो भाव शासन देत आहे. अमरावती कृषि उत्पन्न बाजार समिती येथे नाफेडच्या वतीने महाराष्ट्र स्टेट कॉऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनद्वारा सुरु करण्यात आलेल्या शासकीय मुंग खरेदी केंद्राच्या शुभारंभा प्रसंगी पालकमंत्री प्रविण पोटे बोलत होते.
          यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल वऱ्हाडे, संचालक किशोर चांगोले व कृषि उत्पन्न बाजार समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी यावेळी पालकमंत्र्यांचे स्वागत केले.
          जिल्ह्यात अमरावती व दर्यापूर या दोन ठिकाणी शासकीय मुंग खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. केंद्र शासनाने सन 2016-17  या हंगामासाठी मुंग या शेतमालास 4800 रुपये व बोनस 425 असे एकूण 5225 रुपये भाव जाहिर केला आहे. विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यात सर्वप्रथम हे दोन शासकीय खरेदीकेंद्र उघडण्यात येत असुन दर्यापूरचे केंद्र दि.7 सप्टेंबर, 16 पासुन सुरु करण्यात आले. तर अमरावतीच्या केंद्राचा शुभारंभ आज झाला. सर्वप्रथम काटापुजन करण्यात आले. त्यानंतर जसापूर येथील शेतकरी प्रकाश वानखडे यांच्या मुंग खरेदीला पालकमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात झाली. मुंगांची खरेदी हमी भावापेक्षा कमी दराने होत असल्याच्या पार्श्वभुमिवर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होवू नये म्हणून राज्य शासनाने हे खरेदी केंद्र सुरु केले. दरवर्षी 1 ऑक्टोबर पासुन ही केंद्र कार्यान्वित होतात मात्र शेतकऱ्याच्या आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ही खरेदी केंद्रे आजपासुन सुरु करण्यात आली.  
00000
वाघ/गावंडे/सागर/दि.08-09-2016/14-04 वाजता


                                                                                                                                       




 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...