Monday, January 17, 2022

कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांची प्रिसिजन इंजिनिअरिंग प्रयोगशाळेला भेट

 






 

कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांची

प्रिसिजन इंजिनिअरिंग प्रयोगशाळेला भेट

 

  अमरावती दि 17 :  येथील औद्योगिक वसाहतीतील प्रिसीजन इंजिनीअरिंग प्रयोगशाळेला कामगार व जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी भेट देऊन पाहणी केली.

औद्योगिक वसाहतीत अशोक वर्मा व नरेंद्र वर्मा यांनी सुरु केलेल्या या प्रयोगशाळेत बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य जसे की, बिटूमाईन, विटा, लोखंडी गज, काँक्रिटच्या विटा, स्टिल, इत्यादी वापरण्यात येणारे साहित्याची चाचणी येथे करण्यात येते. ही क्वालिटी कंट्रोल लॅब असून, वस्तूचे प्रमाणीकरण त्याद्वारे होते. शासकीय व निमशासकिय कंत्राटदार बांधकाम करत असताना, संबंधित बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा दर्जा व गुणवत्तेचे प्रमाणीकरण या प्रयोगशाळेद्वारे केले जाते. या प्रयोगशाळेतील उपकरणांची माहिती राज्यमंत्री श्री. कडू यांनी जाणून घेतली.

साहित्याची तपासणी करण्याची प्रक्रिया व तांत्रिक बाबीची माहिती त्यांनी घेतली. यावेळी प्रयोगशाळेत काम करणारे तंत्रज्ञ व संबंधित उपस्थित होते.

0000000

 

 

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...