बियाणे, खते व कीटकनाशक परवाना नव्या प्रणालीवर कार्यरत करावा ‘एसएओ’ यांचे कृषी सेवा केंद्रधारकांना आवाहन

 

बियाणे, खते व कीटकनाशक परवाना नव्या प्रणालीवर कार्यरत करावा

‘एसएओ’  यांचे कृषी सेवा केंद्रधारकांना आवाहन

अमरावती, दि. 21 : जुने ई- परवाना संकेतस्थळ बंद झाल्याने जिल्ह्यातील सर्व बियाणे, खते व कीटकनाशके विक्रेते व कृषी सेवा केंद्रधारक यांनी त्यांचे परवाने आपले सरकार या पोर्टलअंतर्गत नव्या प्रणालीवर कार्यरत करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान यांनी केले आहे.

नव्या प्रणालीत भरावयाची माहिती व प्रक्रियेबाबत गत महिन्यात कृषी केंद्र संचालकांचे प्रशिक्षणही घेण्यात आले आहे. त्यामुळे सर्व केंद्रधारकांनी बियाणे, खत परवाना व कीटकनाशके परवान्यांच्या नव्या प्रणालीतील नोंदी जानेवारीअखेरपर्यंत पूर्ण करून घ्याव्यात, असे आवाहन श्री. खर्चान यांनी केले.

सर्वात प्रथम माहिती अद्ययावत करणा-या विक्रेत्याचा सत्कार

 जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील व-हा येथील जनाई कृषी सेवा केंद्राचे संचालक रितेश आगरकर यांनी नव्या प्रणालीवर जिल्ह्यात सर्वात प्रथम आपले परवाने नोंदवून कार्यान्वित केले. त्यामुळे त्यांना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. खर्चान यांच्या हस्ते शाल-श्रीफळ व नविन प्रणालीवरील परवाना देऊन गौरविण्यात आले.

00000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती