‘स्काय वॉक’ विकासाला केंद्राची परवानगी जिल्ह्यात पर्यटन विकासाला गती मिळेल - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 









स्काय वॉकविकासाला केंद्राची परवानगी

जिल्ह्यात पर्यटन विकासाला गती मिळेल

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

 

अमरावती, दि. २१ : चिखलदरा येथील स्काय वॉकचे काम लवकरच पूर्णत्वास जाण्याची चिन्हे आहेत. स्काय वॉक  विकासाला केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्यात नुकतीच याबाबत बैठक होऊन केंद्र शासनाकडून परवानगी मिळण्यासाठी राज्य शासनाने पाठपुराव्याची मागणी पालकमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार तत्काळ पाठपुरावा होऊन परवानगी प्राप्त झाली आहे. स्काय वॉक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

विदर्भाचे नंदनवन असलेल्या मेळघाटातील चिखलदरा येथे स्काय वॉकचे काम पूर्ण होण्यास आता गती मिळेल.  जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.  स्काय वॉक पर्यटकांसाठी एक महत्वाचे आकर्षण केंद्र ठरणार असून, पर्यटकाचा ओघ वाढेल. स्थानिकांमध्ये रोजगारनिर्मिती वाढेल, असा विश्वास पालकमंत्री ऍड. ठाकूर यांनी व्यक्त केला.

 

जिल्ह्यातील पर्यटन विकासकामांतील प्रलंबित बाबी, पर्यावरणविषयक परवानगी आदी प्रक्रिया, विविध पर्यटनस्थळांचा विकास, आवश्यक निधी याबाबत पर्यटन व पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे व पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक  झाली. बैठकीला अमरावती येथून अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

 

चिखलदरा येथील स्कायवॉकचे काम पूर्ण होण्यासाठी केंद्र शासनाकडून परवानगी मिळणे आवश्यक असल्याच्या विषयाबाबत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी या बैठकीद्वारे लक्ष वेधले होते. त्यानुसार या कामाबाबत तत्काळ पाठपुरावा करू, अशी सकारात्मकता पर्यटन मंत्री श्री. ठाकरे यांनी दर्शवली. त्यानुसार पाठपुरावा गतीने होऊन  परवानगी प्राप्त झाली आहे. 

 

जिल्ह्यात एक महत्वाची पर्यटन सुविधा याद्वारे निर्माण होणार आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी व पर्यावरणविषयक बाबींसंदर्भातही महत्वपूर्ण चर्चा पर्यटनमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. अमरावती शहरातील शिवटेकडी, वडाळी तलाव यांचा विकास व सुशोभीकरण, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पर्यटन उद्यान, तसेच जिल्ह्यातील केकतपूर, शेवती, संगमेश्वर आदी पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी मिळवून देण्यासा पर्यटनमंत्री श्री. ठाकरे यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. त्यानुसार ही कामे लवकरच पूर्णत्वास जातील व अमरावती जिल्ह्यात पर्यटनाबाबत विकासाला चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.  

 

 

 

०००

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती