अठरा वर्षांवरील सर्वांनी मतदार यादीत नाव नोंदणीची प्रक्रिया पुर्ण करावी

 




अठरा वर्षांवरील सर्वांनी मतदार यादीत

नाव नोंदणीची प्रक्रिया पुर्ण करावी

 

मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे मंजिरी अलोणेने केले आवाहन

    अमरावती, दि. 21 : 25 जानेवारी हा दिवस आपण राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करतो. जिल्हा निवडणूक कार्यालयाच्यावतीने नवव्या वर्गातील कु.मंजिरी अलोणे हिची ब्रॅंड अँम्बेसीडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूकीच्या पवित्र कार्यात सहभाग घेऊन लोकशाही बळकट करण्याचे आवाहन तिने सर्व नागरिकांना केले आहे. वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक-युवतींनी मतदार यादीमध्ये आपले नाव अवश्य नोंदवावे. “सर्वसमावेशक, सुलभ व सहभागपूर्ण” ही यंदाच्या निवडणूकीची थीम आहे. धनुर्विद्या पटू अचूक लक्षवेध साध्य करण्यासाठी एकाग्रतेचा सराव करतो. स्वसहभागातुन तो लक्षाचा अचुक वेध घेतो, त्याचप्रमाणे लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. मजबुत लोकशाही निर्माण करण्याकरीता आपण सर्वांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे.  मतदार यादीत नाव नोंदवण्याची प्रक्रिया अंत्यत सोपी व सुलभ आहे. मतदान अधिकारी यांच्याकडे जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने आपण  आपल्या नावाची नोंद करु शकतो. अठरा वर्षे वयावरील सर्वांनी मतदान नोंदणी करण्याचे आवाहन मंजिरी अलोणे हिने केले आहे.    

0000000

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती