शाळा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय नाही - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 



जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढली; नागरिकांना दक्षता पाळण्याबाबत आवाहन

शाळा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय नाही

- जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती, दि. 21 : जिल्ह्यात कोविडबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ते पाहता सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यात शाळा सुरू करण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. पुढील आठवडाभरातील परिस्थिती तपासूनच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे सांगितले.

 

शाळा सूरू करण्याच्या निर्णयाबाबत जिल्हाधिकारी श्री. कौर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महापालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकर, तसेच आरोग्य विभागाच्या अधिका-यांशी चर्चा करून विविध बाबींची माहिती घेतली.  राज्यातील पहिली ते बारावीच्या शाळा 24 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तथापि, आजमितीला अमरावती जिल्ह्यातील कोविडबाधितांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट 25 टक्क्यांवर गेला आहे. शेजारील अकोला जिल्ह्यातही बाधितांचे मोठे प्रमाण आहे. त्यामुळे अशा स्थितीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे घेणे उचित होणार नाही.

 

साथ रोखणे व सुरक्षितता जपणे हेच सध्याचे सर्वोच्च प्राधान्य आहे.  त्यामुळे पुढील आठवड्यातील स्थिती पाहूनच शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ. या काळात नागरिकांनी मास्कचा वापर, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स पाळणे, कुठलीही लक्षणे असल्यास तत्काळ चाचणी करून घेणे व उपचार घेणे आवश्यक आहे. ज्यांनी अद्यापही लसीकरण केले नसेल त्यांनी ते तत्काळ करून घ्यावे, तसेच सर्वांनी कोविड अनुरूप वर्तणूक ठेवून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले आहे.

 

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती