‘नारीशक्ती पुरस्कारा’साठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी

‘नारीशक्ती पुरस्कारा’साठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी

 

अमरावती, दि.18: केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विभागामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व स्वयंसेवी संस्थांना दरवर्षी 8 मार्च रोजी ‘नारीशक्ती पुरस्कारा’ने गौरविण्यात येते. या पुरस्कारासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला आणि स्वयंसेवी संस्था यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी 2022 आहे.

            इच्छुक महिला तसेच स्वयंसेवी संस्था यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपले अर्ज व नामनिर्देशन आवश्यक त्या कागदपत्रांसह केंद्र शासनाच्या www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावे.

            अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,  ‘दत्तात्रय सदन’, दसरा मैदान रोड, भुतेश्र्वर चौक, देशपांडेवाडी, दुरध्वनी क्रमांक 0721- 2575911 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी पत्रकाव्दारे केले आहे.


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती