ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शांततेत मतदान

 


























ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शांततेत मतदान

            अमरावती, दि. 15  : जिल्ह्यातील 537 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. दुपारी साडेतीनपर्यंत 59.19 टक्के मतदान झाले.

निवडणूकीच्या शेवटच्या दोन तासांत केंद्रांवर मोठी गर्दी झाली. मतदानाच्या वेळेत केंद्रात उपस्थित झालेल्या सर्वांना मतदानाची संधी मिळाली. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान चालले. त्यामुळे शेवटच्या दोन तासांतील आकडेवारी प्राप्त होऊ शकली नाही. तरी अंदाजे 80 टक्क्यांच्या आसपास मतदानाची टक्केवारी पोहोचल, असा अंदाज वर्तविण्यात आला.

मतदानासाठी आज गावागावांतून मतदान केंद्रांवर सकाळपासूनच गर्दी व्हायला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. नवमतदार तरूण- तरूणी, ज्येष्ठ व्यक्ती, दिव्यांग बांधव यांनीही उत्साहात आपला मतदानाचा हक्क बजावला. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच निवडणूक केंद्रावर दक्षतेची खबरदारी घेण्यात आली होती. मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर पाळण्याच्या सूचना दर्शनी भागात व केंद्रावर देण्यात येत होत्या. कोविड संशयितांसाठी विलगीकरण कक्षही केंद्रावर उघडण्यात आला होता.

 

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती