श्रीक्षेत्र रिद्धपूर विकासासाठी स्वतंत्र आराखडा - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 






श्रीक्षेत्र रिद्धपूर विकासासाठी स्वतंत्र आराखडा

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. २५ : महानुभाव पंथाची काशी, गोविंदप्रभू यांचे देवस्थान व मराठी भाषेसाठीचे महात्म्य स्थळ असलेल्या श्री रिद्धपूर क्षेत्राच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा करण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज केली.

पालकमंत्री ऍड. ठाकूर यांच्या हस्ते रिद्धपुर ते तिवसा रा मा 300 चे महामार्ग विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी रिद्धपूर येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी कार्यक्रमाला आमदार देवेन्द्र भुयार, जि. प. सदस्य दत्ताभाऊ ढोमणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, केवळ रस्तेविकास नव्हे, इतरही विविध विकास कामांसाठी स्वतंत्र आराखडा करण्यात येईल. आशियाई विकास बँक अर्थ सहाय्यीत रिद्धपुर - तिवसा रामा 300 रस्त्याची सुधारणा बांधकाम होणार आहे. त्यासाठी 161 कोटी मंजूर करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे, गावाच्या ठिकाणी सिमेंट चा रस्ता राहणार आहे, वीज पाणी व इतर सेवा वाहिन्यांसाठी विशेष पाईप लाईन राहणार, एस टी बस साठी विशेष थांबा व शेल्टर राहणार आहे.

 

स्वतंत्र आराखडा

रिद्धपुर विकास आराखडा सर्वांगीण व सविस्तर झाला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी गोविंद प्रभू राहिलेत त्या त्या सर्व ठिकाणांचा विकास व्हावा या हेतूने समग्र तपशिलासह आराखडा तयार करण्यात येणार आहे, असेही पालकामंत्र्यांनी सांगितले.

 

आमदार देवेंद्र भुयार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती