नागरी सेवा-सुविधांची बांधकामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 




नागरी सेवा-सुविधांची बांधकामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करा

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

               अमरावती, दि. 25 : पायाभूत सुविधा निर्माण करतांना नागरी सेवा-सुविधांची कामे कायमस्वरुपी टिकण्यासाठी स्थापत्य कामांचा दर्जा हा गुणवत्तापूर्ण असावा. शासनाच्या विकास निधीतून उभारण्यात येणाऱ्या बांधकामा संदर्भात नागरिकांकडून कुठल्याही प्रकारच्या तक्रारी येता कामा नये, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

मोर्शी तालुक्यातील तळेगाव (दा.) येथील नवीन पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे व अडगाव येथील आयुर्वेदिक दवाखान्याच्या नवीन इमारत बांधकामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार देवेंद्र भुयार, जि.प. सदस्य दत्ताभाऊ ढोमणे, सार्व. बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता अरुंधती शर्मा  यांच्यासह ग्रामस्थ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे व आरोग्य विभागाचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा योजने अंतर्गत मोर्शी तालुक्यातील मौजे तळेगाव (दा.) या गावात पाण्याच्या उंच टाकीचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कामाची अंदाजित किंमत 12 लक्ष रुपये आहे. पाण्याच्या टाकीचे काम हे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावे. जल शुध्दीकरण व पाणी पुरवठ्याची उत्तम सुविधा या माध्यमातून स्थानिकांना मिळणार आहे.

 

यानंतर मोर्शी तालुक्यातील अडगाव बु. येथील आयुर्वेदीक दवाखान्याच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांचे हस्ते झाले. या इमारतीच्या बांधकामासाठी अंदाजित 62.95 लख खर्च येणार आहे. मंजूर निधीतून उत्कृष्ठ स्थापत्य सर्व सुविधा असलेली इमारत उभारण्यात यावी, असे आदेश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. आयुर्वेदीक दवाखान्याच्या निर्मितीतून गावातील व परिसरातील लोकांसाठी आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध होईल, असे श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

 

00000

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती