चांदूर बाजार येथे शासकीय तूर खरेदीचा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते शुभारंभ



चांदूर बाजार येथे शासकीय तूर खरेदीचा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

यांच्या हस्ते शुभारंभ

 

             अमरावती, दि. २९: चांदुर बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आज शासकीय तूर खरेदीचा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. खरेदी विक्री केंद्राचे अध्यक्ष शिवाजीराव बंड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री. भारंबे, दि विदर्भ को ऑप मार्केटिंग फेडरेशन ली. चे पणन व्यवस्थापक उमेश देशपांडे, खरेदी विक्री केंद्राचे व्य वस्थापक अशोक सीनकर यांचेसह शेतकरी बांधव आदी यावेळी उपस्थित होते.

         ६ हजार रुपये शासकीय तूर खरेदीचा हमी भाव तूर विक्रीसाठी आणनाऱ्या शेतकऱ्यासाठी निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती चांदुर बाजार खरेदी विक्री केंद्राचे व्यवस्थापक यांनी दिली.

कोरोनाकाळात शेती क्षेत्रापुढे अनेक अडचणी आल्या. त्यावर मात करत महाविकास आघाडी शासनाने शेतकरी हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले व त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. गत १० वर्षात झाली नाही एवढी विक्रमी कापूस खरेदी झाली. तूर खरेदीलाही आरंभ झाला आहे. अधिकाधिक तूर खरेदी उत्पादक शेतकरी बांधवांचा या प्रक्रियेत समावेश व्हावा व कुणीही वंचित राहू नये म्हणून पुरेपूर प्रयत्न करण्याचे निर्देश राज्यमंत्री  श्री कडू 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती