जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे लसीकरणाचा अंजनगाव बारी येथे शुभारंभ

 










जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे लसीकरणाचा अंजनगाव बारी येथे शुभारंभ

डॉ. दिलीप रणमले यांच्यासह अनेकांचे लसीकरण

 

अमरावती, दि. 17 : ज्या लसीची वाट प्रत्येकास मागच्या एक वर्षापासून होती, त्या लसीची प्रतिक्षा संपली असून कोविड-19 विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा जिल्ह्यात शनिवारी (ता. 16 जानेवारी) शुभारंभ झाला. जिल्हा रुग्णालयातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे व महिला वैद्यकीय अधिकारी उज्ज्वला मोहोड हे लसीकरणाचे पहिले मानकरी ठरले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या लसीकरणाचा शुभारंभ अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्यासह अनेक वैद्यकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी स्वत: कोविशिल्ड लस घेऊन कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविला. ग्रामीण आरोग्य यंत्रणेतही लसीकरणाबाबत स्वागत व आनंद व्यक्त होत असल्याचे डॉ. रणमले सांगितले.

पंचायत समिती सदस्या मिनलताई डकरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेवती साबळे, माता-बालसंगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजेकर, डॉ. मनिषा सुर्यवंशी, डॉ. रिकुंज केचे, डॉ. गंधे, डॉ. मंगेश पाटील, हिवताप सहा. संचालक डॉ. भंडारी, हिवताप अधिकारी डॉ. शरद जोशी, आरोग्य सहायक विलास डहाके, शालीनी लकडे यांच्यासह आरोग्य क्षेत्रातील मान्यवर आदी यावेळी उपस्थित होते.

अंजनगाव बारी येथील आरोग्य केंद्रात कोरोना लसीची रांगोळी काढून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. आरोग्य सेवक राजेश पनजकर यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांना लस देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. येडगे यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना लसीकरण मोहिमेच्या शुभेच्छा देऊन संपूर्ण लसीकरणाचे व्यवस्थापनाबाबत माहिती जाणून घेतली. लसीकरण सुरक्षित व सुरळीत पार पाडण्यासाठी त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. लसीकरण सत्राचे साक्षीदार म्हणून तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी श्री. येडगे यांच्यासह लस घेतलेल्या प्रत्येकांनी स्वाक्षरी उपक्रम राबविला.

लसीकरण मोहिमेत आरोग्य अधिकारी डॉ. मुरादे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे, डॉ. डोंगरे, डॉ. बारस्कर, डॉ. ठाकरे, डॉ. दिलीप चऱ्हाटे, डॉ. मनिषा सुर्यवंशी, प्रशासकीय अधिकारी सुभाष सिडाम, दौप्रदा राठोड यांनी लस घेऊन लस सुरक्षित असल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांना पटवून त्यांचा उत्साह वाढविला.

श्रीमती विजया बारसे, श्रीमती देवपारे, कालींदीनी झोडोपे, ज्योती घुसे आदींनी लसीकरणाचे काम तांत्रिकरित्या यशस्वीपणे पार पाडले. आज झालेल्या लसीकरण सत्रात 44 स्त्री, 56 पुरुष असे एकूण 100 व्यक्तींचे लसीकरण केले. यामध्ये आरोग्य अधिकारी-कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांचा सहभाग होता.

लसीकरण सत्र यशस्वी करण्यासाठी बाबूलाल सिरसाठ, गजानन सुने, शरद मुंडे, ए एम लोखंडे, अमोल वारकरी, एन डी पाटील, राजेश पनजकर, योगेश डायला, संघम सावळे, शशिकांत तभाने, कविता पवार व कार्यालयातील इतर सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती