तूर खरेदीसाठी जिल्ह्यात सहा केंद्रे ; जिल्हा पणन विभागाचे आवाहन

 




आधारभूत खरेदी योजने अंतर्गत तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी

तूर खरेदीसाठी जिल्ह्यात सहा केंद्रे ; जिल्हा पणन विभागाचे आवाहन

अमरावती, दि. 18 :  केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजने अंतर्गत नाफेडच्या वतीने खरीप हंगाम 2020-21 या वर्षात तूर नोंदणी ऑनलाईन पध्दतीने 28 डिसेंबरपासून सुरु करण्यात आली आहे. शेतकरी बांधवांना तूर नोंदणीसाठी जिल्ह्यात सहा खरेदी केंद्र निश्चित करण्यात आली असून शेतकऱ्यांनी तालुक्याच्या केंद्राच्या ठिकाणी संपर्क साधून तूरीची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी श्रीमती के.पी.धोपे यांनी केले आहे.

शेतकरी बांधवांनी तूर नोंदणीकरीता खरीप हंगाम 2020-21 मधील पिक पेरा नोंद असलेला तलाठ्याचा सही‍ शिक्क्यानिशी ऑनलाईन सातबारा, आधारकार्डची छायांकित प्रत, बँक पासबुक प्रत खरेदी केंद्रावर सोबत आणने आवश्यक आहे. बँक पासबुकवर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक, आयएफसी कोड स्पष्ट नमूद असावा तसेच जनधन खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक सादर करु नये, अशा सूचना विभागाने दिल्या आहे.

तालुकानिहाय तूर खरेदी केंद्र पुढीलप्रमाणे :

अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मधुकरराव टवलारकर व्यापारी संकुल, सिव्हील लाईन, परतवाडा तालुका खरेदी विक्री संघ, अचलपूर येथे नोंदणी करावी. या केंद्राचे केंद्र चालक-संतोष चित्रकार (8208397482) आहे. चांदूर रेल्वे तालुक्याच्या शेतकऱ्यांनी स्टेट बँके समोर, धनराज नगर तालुका खरेदी विक्री संघ, चांदूर रेल्वे येथे नोंदणी करता येईल व याचे केंद्र चालक सुरेश ढाकुलकर (7020430780) हे आहेत. दर्यापूर तालुक्यात आकोट रोड, तालुका खरेदी विक्री संघ, दर्यापूर येथे नोंदणी सुरु असून केंद्र चालक श्री. राजेंद्र गावंडे ( 9604322230) आहेत. धारणी तालुक्यात सहकार भवन तालुका खरेदी विक्री संघ, धारणी येथे नोंदणी सुरु असून केंद्र चालक सतीष पटोरकर (9373724430) आहेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात डॉ. इंगळे यांच्या दवाखान्याजवळ, तालुका खरेदी विक्री संघ, नांदगाव खंडे. येथे नोंदणी सुरु असून केंद्र चालक देविदास खंडार (8975851731) आहेत. तिवसा तालुक्यात आझाद चौक, डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, तालुका खरेदी विक्री संघ, तिवसा येथे नोंदणी सुरु असून केंद्र चालक श्रीकांत देशमुख (9172608266) आहेत.

संबंधित तालुक्यातील व तालुक्याला जोडलेल्या तूर खरेदी केंद्राच्या ठिकाणी तूर हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती