Saturday, January 30, 2021

नेत्रदान चळवळ सर्वदूर पोहोचावी - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 










लोकनेते स्व.भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त नेत्र तपासणी शिबिर

नेत्रदान चळवळ सर्वदूर पोहोचावी

 - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावतीदि. 30 :  नेत्रदान चळवळीत अमरावती जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. ही चळवळ राज्यात सर्वदूर पोहोचावीअसे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा येथे सांगितले.

तिवसा येथे लोकनेते स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होतेत्याचा शुभारंभ करताना त्या बोलत होत्या. जि. प. अध्यक्ष बबलूभाऊ देशमुखआमदार बळवंतराव वानखडेमाजी आमदार वीरेंद्र जगतापतिवसा येथील नगराध्यक्ष वैभव वानखडे

जि. प. सभापती बाळासाहेब हिंगणीकरमहिला व बालकल्याण सभापती पूजा आमलेवैद्यकीय अधिकारी पावन मालूसुरे,दिलीपभाऊ काळबांडेमुकुंदराव देशमुखयोगेश वानखडेअंकुश देशमुखसागर राऊतदिवाकर भुरभुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सकाळपासून शिबिरात तपासणीला येणाऱ्याचा ओघ सुरू झाला.असंख्य रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. नेत्र तपासणी नंतर गरजूंना नेत्र आरोग्य राखण्यासाठी संबंधित तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

आदित्य ज्योत  फाउंडेशन आणि स्व. भैय्यासाहेब ठाकूर समितीच्या  वतीने  गरजुसाठी  नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. मोतीबिंदू,मधुमेह आजार असलेल्या रुग्णांची तपासणी विशेष कक्षात करण्यात येत होती. नेत्र तपासणीनंतर चष्म्याचे वाटप पालकमंत्री यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...