Thursday, December 7, 2017

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम
महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धा 2017 चा निकाल जाहीर
मुंबईदि. 7 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने आयोजित महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धा 2017 चा निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेत प्रथम क्रमांक वेदांत कुलकर्णी (कोल्हापूर)द्वितीय क्रमांक दीपक कुंभार (कोल्हापूर) तर तृतीय क्रमांक अंशुमन पोयरेकर(मुंबई) यांनी पटकावला आहे.
या स्पर्धेतील पाच उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी प्रशांत खरोटे (नाशिक)राजेंद्र धाराशिवकर (उस्मानाबाद)सुनिल बोर्डे (बुलढाणा)उमेश निकम(पुणे)सुशिल कदम(नवी मुंबई) यांची निवड करण्यात आली आहे.  माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी आज निकाल जाहीर केला. प्रथमद्वितीयतृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रकारांना अनुक्रमे 25 हजार, 20 हजार, 15 हजार तर उत्तेजनार्थ पाच पारितोषिकांसाठी प्रत्येकी तीन हजार रूपये प्रदान केले जाणार आहेत. 
            महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीनऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी 3,210 छायाचित्रे प्राप्त झाली होती. त्यातील दर्जेदार छायाचित्रांचे राज्यभरात प्रदर्शन भरविण्यात येणार असून प्रदर्शनाची सुरूवात नागपूर येथून होणार आहे.
            प्राप्त छायाचित्रातून विजेत्यांची निवड आणि प्रदर्शनासाठी दर्जेदार छायाचित्रांची निवड करण्यासाठी माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कामकाज पाहिले. या समितीत संचालक (प्रशासन) अजय अंबेकरसंचालक (माध्यम समन्वयक) शिवाजी मानकरज्येष्ठ पत्रकार रवींद्र आंबेकरज्येष्ठ छायाचित्रकार नितीन सोनवणेसंजय पेठेअनिल छड्डा यांचा समावेश होता.
            राज्यभरात लवकरच या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून  याचा लाभ सर्वांनी घ्यावाअसे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
००००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...