खोलापूरला पावणेचार कोटी निधीतून पाण्याची टाकी

पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

पाण्याचे दुर्भिक्ष कायमस्वरूपी संपवण्यासाठी प्रयत्नरत

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. १४ : पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू नये म्हणून राज्य शासनाकडून अनेक पाणीपुरवठा योजनांना चालना व जलसंवर्धनाचे प्रयत्न होत असल्याचे पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज सांगितले.

खोलापूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत ३ कोटी ८० लक्ष रुपये निधीतून होणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. श्रीमती अर्चना ढोके, अनिस अहमद, हरिभाऊ मोहोड, मुकदर खान पठाण, आशुतोष देशमुख, राजू देशमुख, बाबुराव देशमुख, इरफान भाई,श्रीमती सरला इंगळे, जउद्देन भाई, गफार शहा, राजू पवार, प्रजोत यावले, निखिल  देशमुख, देवानंद गुडधे, वसंत इंगळे आदी उपस्थित होते.

 

पालकमंत्री म्हणाल्या, पाणी हेच जीवन आहे. पाण्याची बचत करून पाण्याचा वापर करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी पाणीपुरवत्याबरोबर जलसंवर्धनाचाही प्रयत्न शासनाकडून होत आहे.

खोलापूर  येथील नागरिकांना  पाणीटंचाई  भेडसावत होती. प्यायच्या आणि वापराच्या पाण्याचा साठा अपुरा राहू नये यासाठी 3.50 लक्ष लिटर क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीची इथे निर्मिती करण्यात येणार आहे.  उन्हाळा सुरू होण्याच्या आत टाकीचे काम पूर्ण करण्याबाबत आणि पाण्याचा नियमित पुरवठा करण्यात यावा, याबाबत श्रीमती ठाकूर यांनी संबंधितांना सूचना केल्या.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती