स्वातंत्र्यसैनिक वेतनाची थकबाकी अदा करण्यासाठी जिल्ह्याला 65 लाखांचा निधी

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश

 

अमरावती, दि. 19 : केंद्र शासनाकडून निवृत्तीवेतन मंजूर झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे थकित वेतन मिळवून देण्यासाठी महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. हे वेतन अदा करण्यासाठी अमरावती जिल्ह्यासाठी एकूण 65 लाख 82 हजार अनुदान वितरीत करण्यात आले आहे.

केंद्र शासनाचे स्वातंत्र्यसैनिक सन्मान निवृत्तीवेतन मंजूर असलेल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांना वेतन नियमित न मिळाल्याबाबत निवेदने प्राप्त झाली होती. नेरपिंगळाई येथून मारोतराव इंगळे यांनीही याबाबत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांना निवेदन दिले होते. पालकमंत्र्यांनी त्याची तत्काळ दखल घेत ही बाब राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणली.

केंद्रीय स्वातंत्र्य सैनिकांना प्रतिमहा मिळणारे पेन्शन मोठ्या कालावधीपासून मिळत नसून, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बँकांनाही सूचित करण्यात आले होते. त्यामुळे पेन्शन थकबाकीसह तात्काळ अदा करण्याबाबत आदेशित करण्याचे विनंती पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्याकडे निवेदनातून केली होती. त्यानुसार राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून निधी वितरणाबाबत निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्याला 65 लाख 82 हजार रूपये पेन्शन वितरणासाठी प्राप्त झाले आहेत.

केंद्र शासनाच्या गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांना सन्मान निवृत्तीवेतन योजना पूर्वलक्षी प्रभावाने मंजूर झाल्याने त्यांना त्या दिनांकापासून राज्य शासनाची पूर्ण पेंशन देण्याऐवजी दरमहा 500 रूपये अतिरिक्त सन्मान निवृत्तीवेतन देण्याचे आदेश 16 नोव्हेंबर 2004 च्या पत्रान्वये देण्यात आले. त्यानंतर याप्रकरणी दाखल याचिकेत 14 जून 2017 च्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शासनाकडून केंद्र शासन व राज्य शासन स्वातंत्र्यसैनिक निवृत्तीवेतनधारकांना अदा करावयाच्या फरकाची रक्कम अदा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांना निधी वितरीत होतो.

हा निधी प्राप्त न झाल्यामुळे पेन्शन वितरणात अडथळा निर्माण झाला होता. पालकमंत्र्यांनी त्याचा वेळीच पाठपुरावा केला. त्यामुळे संबंधित सर्वांना त्यांचे निवृत्तीवेतनाची थकबाकीसह पेन् मिळणार आहे.

                                    000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती