महिला व बालकांच्या सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी जिल्ह्यात रक्षादीप मोबाईल व्हॅन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

 



महिला व बालकांच्या सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी जिल्ह्यात रक्षादीप मोबाईल व्हॅन

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

 

अमरावती, दि. 12 : महिला व बालकांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृतीसाठी अमरावती जिल्हा पोलीस दलातर्फे रक्षादीप मोबाईल व्हॅनचा शुभारंभ राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाला.

महिला व बालकांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक दक्षता, आत्मसंरक्षण, पोलीस सेवांची माहिती आदींबाबत जनजागृतीसाठी रक्षादीप उपक्रम उपयुक्त ठरेल. अत्याचाराला वेळीच विरोध करून त्याचा बिमोड करण्यासाठी आत्मसंरक्षण, कायद्याची माहिती, आत्मविश्वासाने व्यक्त होणे, निडरपणे खंबीर भूमिका घेणे आवश्यक असते. त्याबाबत जागृतीसाठी असे उपक्रम वेळोवेळी राबवले जावेत, अशी अपेक्षा पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केली.

            आमदार बळवंतराव वानखेडे, महापौर चेतन गावंडे,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, सदस्य शरद मोहोड, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक हरी बालाजी, महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोडे आदी उपस्थित होते.

            जिल्ह्यातील विविध पोलीस कार्यालये व ठाण्यांच्या माध्यमातून महिला व बालकांच्या सुरक्षिततेबाबत वेळोवेळी उपक्रम राबविण्यात येतात. अत्याचाराच्या किंवा कठीण प्रसंगी बचाव कसा करावा, आत्मविश्वास व पोलीस सेवांची मदत कशी मिळवावी आदींबाबत पोलीस दलाने लघुपट निर्माण केले आहेत. त्यांचे प्रदर्शनही या व्हॅनच्या माध्यमातून होणार असल्याचे श्री. बालाजी म्हणाले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती