पालकमंत्र्यांकडून महिला दिनाच्या शुभेच्छा




 पालकमंत्र्यांकडून महिला दिनाच्या शुभेच्छा

आत्मविश्वासाने आव्हानांचा सामना करा

-   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

          अमरावतीदि. 7 : प्रत्येकात शक्ती असते. कुणीही दुर्बल नसतो. त्यामुळे आव्हानांना घाबरून जाण्यासारखे काही नसते. महिलाभगिनींनीही आपली शक्ती ओळखून आत्मविश्वासाने आव्हानांचा सामना करत त्यावर मात केली पाहिजेअशा शब्दांत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी नागरिकांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  

चुझ टू चॅलेंज’ ही यंदा आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम आहे. त्यानिमित्त समस्त महिलाभगिनींना शुभेच्छा देताना पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की,  प्रत्येकात निश्चित कुठलीतरी शक्ती असते. त्यामुळे अन्याय कधीही सहन करता कामा नये. आत्मविश्वासाने व खंबीरपणे त्याचा प्रतिकार केला पाहिजे. महिलाभगिनींनी सतत व्यक्त झाले पाहिजे.  तुम्ही जगाकडे पाठ कराअख्खे जग तुमच्या पाठीशी राहील’ असे एक वचन आहे. त्यानुसार आत्मविश्वासाने व्यक्त झाले पाहिजे व अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजेअसेही त्यांनी सांगितले.

 

00000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती