Thursday, March 4, 2021

ज्येष्ठांच्या लसीकरणाला वेग

 






ज्येष्ठांच्या लसीकरणाला वेग

दक्षता उपायांचे पालन करण्याबाबतही मान्यवरांकडून आवाहन

अमरावती, दि. 4 : कोरोनावरील लस ही मोठी उपलब्धी आहे. ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. सर्वांनाच टप्प्याटप्प्याने ही लस मिळणार आहे. त्याचबरोबर, सध्याची कोरोना साथ पाहता प्रतिबंधक दक्षता उपायांचेही काटेकोर पालन करावे, असे आवाहन लेडी गव्हर्नर कमलताई गवई व माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख यांनी आज येथे केले.

जिल्हा रूग्णालयाच्या नर्सिंग स्कूलमधील लसीकरण केंद्रात लेडी गव्हर्नर कमलताई गवई, माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख व  पुष्पाताई साखरे यांनी आज कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. कोरोनाची साथ संपवण्यासाठी लसीकरण तर होतच आहे. मात्र, त्याबरोबरच गर्दी टाळणे व दक्षता उपायांचे पालनही होणे आवश्यक आहे, असे आवाहन श्रीमती गवई यांनी केले.

           शहराच्या उपमहापौर कमलताई साहू यांनीही आज पीडीएमसी रूग्णालयात जाऊन लस घेतली. महापालिकेच्या रूग्णालयांत लसीकरण सुरळीत सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन श्रीमती साहू यांनी केले.

            जिल्ह्यात आतापर्यंत अठराशेहून अधिक ज्येष्ठ व्यक्तींचे लसीकरण झाले आहे,  असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले.

00000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...