Tuesday, March 16, 2021

 




आखतवाडा आग नुकसानाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

पीडितांच्या पुनर्वसनासाठी तात्काळ कार्यवाही करावी

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. १५ : आखतवाडा येथील आग नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून द्यावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिले.आखतवाडा येथे शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीमुळे पाच झोपड्या जळून नुकसान झाले.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

 

या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्र्यांनी आखतवाडा येथे जाऊन नुकसानीची पाहणी केली व नुकसानग्रस्तांचे सांत्वन करत त्यांना दिलासा दिला. 

नुकसानग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तत्काळ कार्यवाही करावी व त्यांना शक्य ती सर्व मदत मिळवून द्यावी, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.तहसीलदार योगेश फरताडे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...