गिर्यारोहक काम्या कार्तिकेयनचा मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते सत्कार




गिर्यारोहक काम्या कार्तिकेयनचा

मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

 

         मुंबईदि. 8 : प्रधानमंत्री राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कार 2021 ने सन्मानित झालेल्या आणि दक्षिण अमेरिकेतील सर्वोच्च शिखर सर करणाऱ्या जगातील सर्वात तरुण गिर्यारोहक काम्या कार्तिकेयन यांचा सत्कार जागतिक महिला दिनी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला.

            यावेळी क्रीडामंत्री सुनिल केदार यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र एनसीसीचे संचालक लेफ्टनंट जनरल वाय.पी खंडूरीआयएमएनयुसीओ कॅप्टन अजित नायर तसेच एनसीसी चे अधिकारीविद्यार्थी आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी महिलाविद्यार्थींनीना जगातिक महिला दिनाच्या यावेळी शुभेच्छा दिल्या.

           ॲड. ठाकूर या यावेळी म्हणाल्यायावेळी गिर्यारोहक काम्या कार्तिकेयन यांनी लहान वयात केलेली कामगिरी उल्लेखनिय असून यापुढे असेच यश मिळवावे यासाठी शासन आपल्या पाठीशी असून शासनातर्फे आवश्यक ती मदत देण्यात येईल.

            ॲड. ठाकूर पुढे म्हणाल्याराष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) हे आपल्याला जीवनात सफल बनविण्याचा मार्ग असून यशाची शिडी चढण्याचे साधन आहे. जीवनात यशस्वी बनण्यासाठी स्वत: वर केंद्रीत व्हावे. कुठलीही गोष्ट अशक्य नसून प्रयत्न करणे गरजेचे आहे. एनसीसी च्या माध्यमातून  जबाबदार व्यक्तीमत्व तयार होते. आज मी ज्या पदावर आहे हे एनसीसीमुळे आहे. एनसीसीची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. तसेच यासाठी अधिकचा निधी उपलब्ध करुन देणे गरजेचे आहेअसेही ॲड. ठाकूर म्हणाल्या.

००००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती