Sunday, March 14, 2021

 

 


नांदगावपेठेत पशुवैद्यकीय दवाखान्याचे भूमीपूजन

पशुधनाची निगा राखण्यासाठी अद्ययावत सेवा

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. १४ : पशुधनाची निगा, पशुआजारावर वेळीच उपचार व साथींवर नियंत्रणासाठी ग्रामीण परिसरात अद्ययावत पशुवैद्यकीय दवाखाना असणे आवश्यक असून, नांदगावपेठेसारख्या अनेक गावे जोडलेल्या महत्वाच्या गावी

उभारला जाणारा पशुवैद्यकीय दवाखाना अत्याधुनिक, अद्ययावत आणि सर्व यंत्रणांनी सुसज्ज असेल, अशी ग्वाहीजिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी दिली.

 

नांदगावपेठ येथे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत साकारल्या जाणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या.  याप्रसंगी  सरपंच सविता डांगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनोद डांगे, पंचायत समिती माजी सदस्य बाळासाहेब देशमुख,

ग्रामपंचायत सदस्य गोलू नागपुरे, मोरेश्वर इंगळे, बाळासाहेब राऊत, जगदीश इंगोले, श्रीमती मंदा कपडे, हमीद शाह, पंकज शेंडे आदी उपस्थित होते.

 

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, पशुधनाचे कृषी संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व आहे.शेतकरी आपल्या पशुधनावर पोटच्या मुलासारखे प्रेम करीत असतो. पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेणे शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असते. परिसरातील पशुधनाच्या तुलनेने पशुवैद्यकीय दवाखान्याची उपलब्धता असणे गरजेचे आहे. ही गरज ओळखुन  हा पशुवैद्यकीय दवाखाना तत्काळ उभारला जाईल. दवाखान्याच्या सुसज्ज इमारतीचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासोबतच सर्व काम दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असावे, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...