Thursday, June 30, 2016


अमरावती शहरात
 महसुल व अन्न औषध प्रशासनाची धाडसी कारवाई
* प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू व सुपारीचा
सुमारे 90 लाख रु. बाजार मुल्याचा साठा जप्त  
जिल्हाधिकारी किरण गित्ते
       अमरावती, दि.28 : अमरावती शहरामध्ये गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू व सुपारी या प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या खुलेआम विक्रीबाबत विविध संघटनांकडुन तक्रारी व निवेदने प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा व मानदे कायदा, 2006 च्या कलम 30 (2) (अ) अन्वये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित केलेल्या अन्न पदार्थाची संयुक्तरित्या शोध मोहिम राबविली.
            महसुल व अन्न औषध प्रशासनाने अमरावती शहरातील खत्री कंपाऊंड, जाफरनिन प्लॉट येथील अशोक वसंतवाणी यांच्या मालकिच्या दोन गोडाऊनमध्ये 4,83,985 रु. किमतीचा तसेच संतोष मंगलाणी यांच्या मालकिच्या तीन गोडाऊनमध्ये 19,88,380 रु. किमतीचा, तसेच जय भोले केंद्र कॉटन मार्केट, अमरावती या ठिकाणी 7960 रु. किमतीचा असा एकूण 24,80,325 रु. किंमत असलेला व अंदाजे 80 ते 90 लाख रुपये बाजारमुल्य असलेला गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू व सुपारी आदी प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मि.श.देशपांडे यांनी दिली.
            प्रतिबंधित अन्न पदार्थाची साठवणूक, वाहतूक, विक्री, उत्पादन इत्यादी करणे हा गुन्हा असुन त्यासाठी अन्न सुरक्षा व मानदे कायदा, 2006 च्या कलम 59 नुसार सात वर्षापर्यंत तुरुंगवास व द्रव्य दंडाची तरतुद आहे. मा.अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या मंजुरी आदेशानंतर संबंधितांविरुद्ध खटले दाखल करण्यात येतील.   
            या संपूर्ण कारवाईत जिल्हाधिकारी अमरावती हे स्वत: उपस्थित होते. कारवाई करण्यासाठी महसुल, अन्न औषध प्रशासनाचे मिळून तीन पथके तयार केली होती. यामध्ये सहाय्यक आयुक्त (अन्न) मिलिंद शरद देशपांडे, व्हि.व्हि.शिंदे, रा.श्री.वाकडे, नि.रा.ताथोड अन्न सुरक्षा अधिकारी, उपजिल्हाधिकारी विशाल मेश्राम, तहसिलदार सुरेश बगळे, नायब तहसिलदार धिरज मांजरे यांच्यासह सुमारे 30 कर्मचाऱ्यांनी कारवाईत भाग घेतला.   
00000

काचावार/सागर/गावंडे/28-06-2016/19-30 वाजता









DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...