Posts

मतदानाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी; केंद्रांवरील सोयी-सुविधांचा घेतला आढावा

Image
  मतदानाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केली मतदान केंद्रांची पाहणी; केंद्रांवरील सोयी-सुविधांचा घेतला आढावा            अमरावती, दि. 25 (जिमाका):   उद्या होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा मतदानाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी काही मतदान केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत मनपा आयुक्त देविदास पवार, जि.प.चे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी   विजय भटकर, बडनेरा मतदार संघ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजय जाधव, अमरावती तहसिलदार विजय लोखंडे आदी यावेळी उपस्थित होते.             जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी सेंट थॉमस इंग्लिश स्कुल   येथील मतदान केंद्राची पाहणी केली. त्यानंतर जूनी वस्ती बडनेरा येथील ऊर्दू प्राथमिक शाळा तसेच पंचायत समिती, भातकुली अंतर्गत उत्तमसरा प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्रांची पाहणी केली. मतदान केंद्रावरील पिण्याच्या पाण्याची सुविधा, कनेक्टीव्हिटी, वीजेचा पुरवठा, शौचालयाची सुविधा, दिव्यांग मतदारांसाठी व

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक; कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी - जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Image
  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक; कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी - जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश                अमरावती, दि.25 (जिमाका) :   लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. नागरिकांना हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे मतदानाच्या दिवशी   सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.   अमरावती लोकसभा मतदारसंघातील सर्व कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी द्यावी, असे आदेश जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी निर्गमित केले आहे.               उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या 5 एप्रिल रोजीच्या शासन निर्णयानुसार निवडणुक होणाऱ्या मतदान क्षेत्रात ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने यांना लागू राहील. खासगी कंपन्या, सर्व दुकाने, निवासी हॉटेल्स, उपाहारगृहे, नाट्यगृहे, मॉल्स, रिटेलर्स, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, व्यापार, औद्योगिक उपक्रम आदींचा त्यात समावेश आहे.   अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक; मतदानासाठी यंत्रणा सज्ज मतदारांनी निर्भयपणे व निष्पक्षपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

Image
  लोकसभा सार्वत्रिक निवडणुक; मतदानासाठी यंत्रणा सज्ज मतदारांनी निर्भयपणे व निष्पक्षपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा - जिल्हाधिकारी सौरभ कटियार         अमरावती, दि. 25 (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2 024 च्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची सज्जता असून मतदारांनी निर्भयपणे व निष्पक्षपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज पत्रकार परिषदेत केले. यावेळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक ग्रामीण विशाल आनंद, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.             07-अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 28 मार्च रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. दि. 4 एप्रिलपर्यंत उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले. तर दि. 8 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. अमरावती मतदार संघाची निवडणुक दुसऱ्या टप्प्यामध्ये उद्या, शुक्रवार दि. 26 रोजी मतदान होणार असून आयोगाने मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठरवून दिलेली आहे. तर दि. 4 जून रोजी मतमोजणी असून आदर्श आचारसंहिता गु

शुक्रवारच्या मतदानासाठी पथके मतदान साहित्यांसह रवाना

Image
  शुक्रवारच्या मतदानासाठी पथके मतदान साहित्यांसह रवाना पोलींग पार्टींना मतदान साहित्याचे वितरण ; मतदान पथके मतदानस्थळी रवाना 18 लाख 36 हजार 078 मतदार  बजावणार   मतदानाचा हक्क जिल्ह्यात 1 हजार 983 मतदान केंद्र ; मेळघाटात   354 सर्वाधिक मतदान केंद्र   अमरावती, दि. 25 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 07-अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. अमरावती मतदारसंघात एकूण 18 लाख 36 हजार 078 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 1 हजार 983 मतदान केंद्र असणार आहेत. जिल्ह्यातील या मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशीन व मतदानासाठी लागणारे आवश्यक साहित्य, साधनसामुग्रीचे वितरण मतदान चमूंना आज वितरीत करण्यात असून मतदान पथके मतदानस्थळी रवाना झाली आहेत. जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून तेथील मतदान केंद्राकरिता ईव्हीएम मशीन व साधनसामग्रींचे बडनेरा मतदारसंघाकरिता श्री. शिवाजी बीपीएड कॉलेज या ठिकाणाहून वितरण झाले. अमरावती मतदारसंघाकरिता ईव्हीएम गोडावून न.

खर्च निरीक्षक यांचेकडून उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या लेख्याची तिसरी तपासणी

  खर्च निरीक्षक यांचेकडून उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या लेख्याची तिसरी तपासणी              अमरावती,   दि.25(जिमाका) : अमरावती लोकसभा मतदार संघात एकूण 37 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. उमेदवारांच्या लेख्यांच्या दुसऱ्या तपासणीवेळी एकूण 37 उमेदवारांपैकी दोन उमेदवार अनुपस्थित होते. अनुपस्थित असलेल्या उमेदवारांना 48 तासांच्या आत निवडणूक खर्चाचे लेखे निवडणूक सनियंत्रण व खर्च कक्षात सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी दिली असून विहित मुदतीत खर्च सादर न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे कळविण्यात आले आहे.                         उमेदवारांच्या खर्चावर देखरेख ठेवण्याकरीता खर्च निरीक्षक अनुपकुमार वर्मा   यांची नेमणूक भारत निवडणूक आयोगाने केलेली आहे. काल दि. 24 एप्रिल रोजी उमेदवारांच्या लेख्यांची तिसरी तपासणी खर्च निरीक्षकांकडून करण्यात आली. यामध्ये तीन उमेदवारांनी तिसऱ्या तपासणीच्या वेळी त्यांच्या दैनंदिन खर्चाचा लेखा सादर केला आहे. परंतू तो शॅडो खर्च नोंदवहीसोबत तुलनात्मकरित्या जुळून येत नाही. तसेच त्यांच्या खर्चाचा काही भाग त्या उमेदवारांनी सादर

'दिलखुलास'मध्ये अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची'लोकसभा निवडणूकांची तयारी' यावर मुलाखत

Image
  'दिलखुलास'मध्ये अमरावतीचे जिल्हाधिकारी  सौरभ कटियार यांची'लोकसभा निवडणूकांची तयारी' यावर मुलाखत               मुंबई, दि. २४ : 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अमरावती जिल्हा प्रशासन सज्ज' याविषयी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  सौरभ कटियार यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास'  कार्यक्रमात शुक्रवार दि. २६  एप्रिल २०२४  रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत मुलाखत प्रसारित होणार आहे.अमरावती जिल्ह्याच्या प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.         अमरावती जिल्ह्यात  निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन, सर्व घटकातील मतदारांसाठी  करण्यात आलेल्या सोयीसुविधा याबाबत अमरावतीचे जिल्हाधिकारी  सौरभ कटियार यांनी माहिती दिली आहे. ००००

नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा; निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करा

Image
  नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा; निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करा             अमरावती, दि.24 (जिमाका) :   निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणा आणि त्यातील प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यादृष्टीने सर्वांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी आपसी समन्वयाने व चोखपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले.                लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व नोडल अधिकाऱ्यांकडून निवडणुक कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी आज घेतला. अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी शिवाजी शिंदे, सूचना प्रसारण अधिकारी मनिष फुलझले, अन्न धान्य वितरण अधिकारी श्री. राऊत, माध्यम सनियंत्रण व प्रमाणिकरण समितीचे नोडल अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, सहायक माहिती अधिकारी सतिश बगमारे तसेच ऑनलाईनव्दारे सर्व सहायक निवडणुक अधिकारी,   तहसिलदार आदी यावेळी उपस्थित होते.                 भारत निवडणूक आयोगाच्या नियमावल