महसूल विभागाची अवैध गौण खनिज वाहतूकीवर धडक कारवाई
*5 हायवांवर जप्त,
अमरावती, दि. 2 (जिमाका) : महसूल विभागाने अमरावती तालूक्यातील अवैधरीत्या वाळू उपसा व वाहतूकीवर सोमवारी रात्री धडक कारवाई केली. या कारवाईत पाच हायवांवर कारवाई करण्यात आली. पाचही हायवा जप्त करून नवीन तहसील कार्यालयात लावण्यात आले आहे.
अवैध गौण खनिज वाहतूकीला आळा घालण्यासाठी भरारी पथकांद्वारे वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. तपासणी दरम्यान अवैध गौण खनिज उपसा व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. दि. 2 डिसेंबर 2025 रोजी रात्री जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणीता चापले, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसीलदार विजय लोखंडे यांचे पथक गस्तीवर होते. अमरावती-डवरगाव रस्त्यावर वाहन तपासणी दरम्यान एमएच 27 डीटी 9366, एमएच 27 डीटी 6494, एमएच 27 डीटी 4555, एमएच 27 डीएल 6494, एमएच 27 डीटी 1480 क्रमांकाचे हायवा अवैधरीत्या रेती वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. पाचही ट्रक पथकाद्वारे मुद्देमालासह जप्त केले. सदर हायवा पुढील कार्यवाहीकरीता अमरावती तहसील कार्यालय येथे लावण्यात आले आहे.
सदर कारवाईत मंडळ अधिकारी सुनील उगले, गजानन हिवसे, ग्राम महसूल अधिकारी सुनिल भगत, हेमंत गावंडे, रामकृष्ण इंगळे, पवन बोंडे, रामदास गोडे आणि पोलीस यांनी सहभाग घेतला.
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment